सुषमा स्वराज : भारतातल्या सर्वात तरुण मंत्री ते लोकनेत्या

मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी हे त्यांचे अखेरचे शब्द होते.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 12:34 AM IST

सुषमा स्वराज : भारतातल्या सर्वात तरुण मंत्री ते लोकनेत्या

माजी परराष्ट्रमंत्री भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी रात्री निधन झालं. त्या 67 वर्षांच्या होत्या. रात्री त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

लोकसभेत कलम 370 रद्द करणारं विधेयक मंजूर झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारं ट्विट केलं. मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी हे त्यांचे अखेरचे शब्द होते.

1977 मध्ये त्या वयाच्या 25 व्या वर्षी हरियाणात पहिल्यांदा मंत्री झाल्या. त्यावेळी त्या देशातल्या सर्वात तरुण मंत्री होत्या. 1990मध्ये त्या पहिल्यांदा खासदार झाल्या. त्यानंतर त्या सात वेळा खासदार होत्या. दिल्लीचं मुख्यमंत्रीपदही त्यांनी भुषवलं होतं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्या माहिती आणि प्रसारण मंत्री होत्या.

उत्कृष्ट वक्त्या, प्रभावी संसदपटू, कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी असलेल्या सुषमा स्वराज भाजपच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांमध्ये अतिशय सक्रिय होत्या. त्यांनी आपल्या भाषणांनी संसदेत अमीट छाप सोडली होती. परराष्ट्रमंत्री असताना ट्विटरवर त्या अतिशय सक्रिय होत्या.

आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला नवा आकार देण्यासाठी कठोर मेहेनत घेतली. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी जगभरात अडचणीत सापडलेल्या भारतीयांना मदत केली. त्याचा शेकडो लोकांना फायदा झाला.

आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला नवा आकार देण्यासाठी कठोर मेहेनत घेतली. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी जगभरात अडचणीत सापडलेल्या भारतीयांना मदत केली. त्याचा शेकडो लोकांना फायदा झाला. (सर्व फोटो - PTI)

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 12:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...