Elec-widget

'...आणि मंत्र्यांच्या बेडरूममध्ये 'बाई' अवतरली !' 'वगैरे वगैरे'चा असाही अर्थ

'...आणि मंत्र्यांच्या बेडरूममध्ये 'बाई' अवतरली !' 'वगैरे वगैरे'चा असाही अर्थ

राजकारण आणि साहित्य अशी दोन्ही अंग लाभलेल्या सुशीलकुमार शिंदेनी यावेळी 'वगैरे...वगैरे...' या शब्दाचा एक अफलातून किस्सा सांगून मंत्री त्यांचे पीए मंडळी आणि शासकीय अधिकारी यांच्यातील 'आंबट' गुपिताची पोलखोल करून उपस्थितांना लोटपोट हसवले...

  • Share this:

सुनील उंबरे, प्रतिनिधी

15 डिसेंबर, पंढरपूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे जसे हाडाचे राजकारणी तसेच ते दिलखुलास रसिक वक्तेही आहेत. काल पंढरपुरातही पुन्हा त्याचा प्रत्यय आला. निमित्त होते. पत्रकार संजय पाठक यांच्या 'फेटे आणि फटकारे' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं...राजकारण आणि साहित्य अशी दोन्ही अंग लाभलेल्या सुशीलकुमार शिंदेनी यावेळी 'वगैरे...वगैरे...' या शब्दाचा एक अफलातून किस्सा सांगून मंत्री त्यांचे पीए मंडळी आणि शासकीय अधिकारी यांच्यातील 'आंबट' गुपिताची पोलखोल करून उपस्थितांना लोटपोट हसवले...

सुशीलकुमार शिंदेंनी नेमका काय किस्सा सांगितला ?

''एक मंत्री महोदय जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघणार होते त्यामुळे मंत्री महोदयांच्या पीएनी जिल्हाधिकाऱ्यांना उद्या आपल्या जिल्ह्यात मंत्री महोदय रात्री मुक्कामी येत आहेत त्यांच्या सरबराईत जेवणाचे मेनू, झोपताना रात्री फळे आणि दुधाची व्यवस्था करा अशा सूचना करताना, त्या पत्रात शेवटी 'वगैरे वगैरे' असं लिहून पूर्णविराम दिला...त्यानंतर नियोजित वेळेप्रमाणे रात्री साडेनऊ वाजता मंत्री महोदय शासकीय विश्रामग्रहावर पोहचले. आलेल्या लोकांशी गप्पा मारून मंत्री महोदय बेडरूममध्ये पोहचले तर तिथं बेडवर त्यांना चक्क बाई दिसली. आपल्या बेडवर अनोळखी बाई पाहून मंत्री महोदय काहिसे दचकलेच. पण त्यांना तात्काळ स्वतः सावरत जिल्हाधिकाऱ्यांना बेडरुमध्ये बोलावून आश्चर्याने हा काय प्रकार म्हणून विचारणा केली.तेंव्हा त्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या पीएनीच वगैरे वगैरेची व्यवस्था करायला सांगितली होती. ''

अर्थात हा गौप्यस्फोट करताना ते मंत्री कोण होते, त्यांचे पीए कोण होते आणि नेमक्या कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा 'वगैरे वगैरे'चा अफलातून शोध लावला, हे मात्र गुलदस्त्यात ठेवले, इतकेच नव्हे तर मंत्र्यांच्या बेडरुमध्ये बसलेली ती बाई बाहेर काढली का तिथेच मुक्कामी राहिली याचा देखील सस्पेन्स शिंदे यांनी कायम ठेवला. शिंदे साहेबांनी पंढरपुरात सांगितलेला हा किस्सा राज्याच्या राजकारणात चांगलाच चवीने चर्चिला जातोय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2017 07:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...