'तर सोडून द्या security cover!', अमृता फडणवीसांवर युवा सेनेची थेट टीका

'तर सोडून द्या security cover!', अमृता फडणवीसांवर युवा सेनेची थेट टीका

अमृता फडणवीस यांनी मुंबईकरांवर टीका केली होती त्यावर युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी कठोर शब्दात टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 03 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी सुरू असलेल्या मुंबई पोलिसांच्या तपासावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण, अमृता फडणवीस यांनी मुंबईकरांवर टीका केली होती त्यावर युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी कठोर शब्दात टीका केली आहे.

सुशांतच्या हत्येमागे सुरू असलेल्या बातम्या आणि तपास हे सगळं पाहता मुंबईकरांनी माणूसकी विसरली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यासंबंधी त्यांनी एक ट्विट केलं आहे. त्यावर उत्तर देत वरुण सरदेसाई म्हणाले की, 'तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांची Security Cover घेऊन असतात आणि त्यांच्यावर असा नीच आरोप करता?' अशा शब्दात ट्वीट केलं आहे.

वरुण सरदेसाई ट्वीटमध्ये म्हणाले की, 'मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांची Security Cover घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता??सोडून द्या की security cover भरोसा नसेल तर !!' अशा कठोर शब्दात सरदेसाई यांनी टीका केली आहे.

पुण्यातला धक्कादायक प्रकार, पोलिसांनीच घडवून आणला शेतकऱ्यावर खुनी हल्ला

अमृता फडणवीस ट्वीटमध्ये काय म्हणाल्या...

सुशांतच्या हत्येमागे सुरू असलेल्या बातम्या आणि तपास हे सगळं पाहता मुंबईकरांनी माणूसकी विसरली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यासंबंधी त्यांनी एक ट्विट केलं आहे. अमृता फडणवीस ट्विटमध्ये पुढे म्हणाल्या की, मुंबईत आता स्वाभिमानी आणि साध्या लोकांचं जगणं सुरक्षित नाही आहे. त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

खरंतर, सुशांतच्या आत्महत्येनंतर तपासात रोज नवीन खुलासे होत आहेत. यावर अनेक राजकीय नेते आणि दिग्गज आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. पण आता मात्र यातून वेगळंच राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 3, 2020, 2:51 PM IST

ताज्या बातम्या