Home /News /news /

सुशांतच्या आई आणि बहिणीचं आधीच झालं होतं निधन, मोलकरणीने दिली धक्कादायक माहिती

सुशांतच्या आई आणि बहिणीचं आधीच झालं होतं निधन, मोलकरणीने दिली धक्कादायक माहिती

सुशांत कोणत्या कौटुंबिक संकटात होता की काय? असे असंख्य प्रश्न समोर उभे राहतात. नक्की काय होतं त्यांचं कौटुंबिक आयुष्य...

    मुंबई, 14 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. खासकरून बिहारमधील त्याचे चाहते खूप दु:खी आहेत. सुशांत हा बिहारचा होता. त्याचं घर, बालपण, नातेवाईक सर्व बिहारमध्ये राहतात. आत्महत्येच्या बातमीनं त्याच्या चाहत्यांच्या मनात असंख्य प्रश्न उभे केले आहेत. त्याचं कुटुंब कसं आहे, सुशांत कोणत्या कौटुंबिक संकटात होता की काय? असे असंख्य प्रश्न समोर उभे राहतात. नक्की काय होतं त्यांचं कौटुंबिक आयुष्य... पटण्यात एकटे राहायचे वडिल सुशांतचे वडील कृष्णा कुमार सिंह (केके सिंह) हे पटण्यातील राजीव नगर इथे घरी एकटे राहायचे. सुशांतला चार बहिणी आहे. त्यातल्या एकीचा मृत्यू झाला. पटण्यातील त्यांच्या घरात काम करणाऱ्या त्यांच्या मोलकरीण लक्ष्मीने दिलेल्या माहितीनुसार, बहीण रूबी नुकतीच मुंबईला गेली होती आणि सुशांतबरोबर राहत होती. सुशांतच्या तब्येतमुळेच ती मुंबईत शिफ्ट झाली होती. वडिलांना फोनवर दिली सुशांतच्या आत्महत्येची माहिती बहिण रुबीने फोन करून वडिलांना सुशांतने आत्महत्या केल्याची माहिती दिली. एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर वडील काही बोलू शकले नाही. त्यांना खूप मोठा धक्का बसला. अजूनही ते या धक्क्यातून सावरू शकले नाहीत. एकीकडे असं असताना दुसरीकडे 2002 मध्ये सुशांतच्या आईचं निधन झालं. त्यानंतर तो दिल्लीला शिफ्ट झाला. आईच्या मृत्यूमुळे सुशांत खूप दु: खी झाला होता. त्याने इंन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट ही आईसाठीच लिहली आहे. सुशांतची बहीण होती क्रिकेटपटू सुशांतच्या तीन बहिणी विवाहित आहेत. सुशांतची बहीण मितु सिंग एक क्रिकेटर आहे. त्याचं कुटुंब मूळचं बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातलं आहे. त्याचा जन्म 1986 मध्ये पटना इथं झाला. डीसीईमध्ये त्याने इंजिनिअरींगचा अभ्यास करताना नृत्य आणि नाट्यगृहात भाग लागला. आणि त्याचं मन या क्षेत्रात वळलं. नाट्यगृहात काम करताना अभ्यासासाठी त्याला वेळच मिळायचा नाही. त्यामुळे त्याने तीन वर्षांत शिक्षण सोडलं आणि अभिनयात करिअर करण्यास सुरुवात केली. संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या