सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput case) मृत्यू प्रकरणाबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याधीच ही आत्महत्या असल्याचे जाहीर केले होते. मात्र सुशांतचे कुटुंबीय आणि बिहार पोलीस हे मान्य करण्यास तयार नाही आहेत, त्यामुळे आता बिहार पोलीस याप्रकरणी नवा तपास करत आहेत. या सगळ्यात आता मुंबई पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याने असा दावा केला आहे की, सुशांत आत्महत्येच्या एक आठवडाआधी सतत तीन गोष्टी गुगल सर्च करत होता. पुण्यातला धक्कादायक प्रकार, पोलिसांनीच घडवून आणला शेतकऱ्यावर खुनी हल्ला आतापर्यंत 40 लोकांचा जबाब नोंदवला सुशांतच्या मृत्यूप्रकरणी आतापर्यंत 40 लोकांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तसेच, सुशांतच्या अकाउंटमधून काढण्यात आलेले पैसे हे दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाले आहे. सुशांतच्या अकाउंटमधून गेल्या वर्षी सर्वात जास्त 2.5 कोटी रुपयांची रक्कम ट्रान्सफर झाली होती. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत तीन मानसोपचार तज्ज्ञांचा जबाबही नोंदवला आहे. लॉकडाऊनमुळे बंदी असूनही पार्टीसाठी गेले धबधब्यावर, 24 तासानंतर सापडला मृतदेह काय होता कुटुंबियांचा जबाब? पोलिसांच्या मते सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याचे वडील केके सिंह, बहिण नीतू आणि मितू सिंह यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. तेव्हा त्यांनी कोणावरही आरोप केले नव्हते. पोलिसांनी असा दावा केला आहे की, या प्रकरणाची प्रोफेशनल रायव्हलरी अंतर्गत तपासणी केली जाईल. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं निधन तपासात बिहार पोलिसांची एण्ट्री मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासावर नाराजी दाखवत सुशांतच्या कुटुंबियांनी पाटणा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर तपासासाठी आयपीएस अधिकारी आणि बिहार शहर पूर्वचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी मुंबईत आले. मात्र मुंबईत आल्यानंतर मुंबई महापालिकेने विनय तिवारी यांना क्वारन्टाइन केलं, आता हे प्रकरण पेटण्याची चिन्ह दिसत आहे. याआधी तपासासाठी मुंबईत आलेल्या बिहार पोलिसांना (Bihar police) मुंबई पोलिसांकडून सहकार्य होत नसल्याचा आरोप करण्यात आला होता.The manner in which #SushantSinghRajputDeathCase is being handled - I feel #Mumbai has lost humanity & is no more safe to live - for innocent, self respecting citizens #JusticeforSushantSingRajput #JusticeForDishaSalian
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) August 3, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.