मोठी बातमी! सुशांतच्या मृत्यचा खुलासा लांबणीवर, CBI सोबत होणारी AIIMS ची बैठक रद्द

मोठी बातमी! सुशांतच्या मृत्यचा खुलासा लांबणीवर, CBI सोबत होणारी AIIMS ची बैठक रद्द

आजची ही बैठक रद्द झाली असून ती उद्या म्हणजेच मंगळवारी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आज सगळ्यांचं लक्ष हे एम्सच्या (AIIMS ) अहवालाकडे लागलं असताना निराशाजनक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज होणीर एम्सची बैठक रद्द करण्यात आली आहे. सुशांतने आत्महत्या केली होती की त्याची हत्या झाली होती? या रहस्याचा उलगडा करणारी ही बैठक होती. पण आजची ही बैठक रद्द झाली असून ती उद्या म्हणजेच मंगळवारी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

यामुळे सुशांतच्या मृत्यूमागचं नेमकं कारण कळण्यासाठी चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. रिपोर्ट्सनुसार सीबीआयबरोबर एम्सच्या डॉक्टरांची बैठक आता मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आली. CBI सोबत आज एम्सच्या डॉक्टरांच्या बैठकीत विसरा आणि पोस्टमार्टम रिपोर्टबद्दल चर्चा होणार होती. या बैठकीनंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर आलं असतं असं म्हटलं जात होतं.

'शिवसेना आंदोलन करूनच मोठी झाली मग आम्ही पण आंदोलन करणार'

आतापर्यंतच्या तपासाची माहिती सीबीआयच्या एसआयटी टीमने वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे. मिळालेल्या सगळ्या पुराव्यांची माहितीही यामध्ये आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या बाबींचा खुलासा होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

दिल्लीस्थित अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (AIIMS) ची फॉरेन्सिक टीम आज CBI कडे आपला अहवाल सादर करणार आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली एम्सच्या तीन सदस्यीय डॉक्टरांच्या पथकाने मुंबईत सुशांतच्या घरी भेट देण्यासाठी आले होते. यावेळी सीबीआयसमवेत दिल्ली एम्सच्या तीन सदस्यांच्या डॉक्टरांच्या पथकाला सगळे पुरावे गोळा केल्याची माहिती समोर आली होती.

Weather Alert: पुढच्या 24 तासांत मुंबईसह या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

एम्सचे फॉरेन्सिक विभाग प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले की, मेडिकल बोर्डाच्या बैठकीनंतर या प्रकरणाचा अहवाल सीबीआयकडे देऊ असं त्यांनी म्हटलं आहे. कोणताही गोंधळ न करता आणि कुठलीही शंका न ठेवता तपास सुरू आहे. त्यातूनच अंतिम निष्कर्ष होईल असंही ते म्हणाले.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 20, 2020, 1:07 PM IST

ताज्या बातम्या