तर ‘धोनी’ इंजीनिअर झाला असता

तर ‘धोनी’ इंजीनिअर झाला असता

जिममध्ये तासन् तास घाम गाळण्यापेक्षा तो स्वतःला फिट ठेवण्यासाठी बॅले डान्सही करतो. याशिवाय त्याने शामक दावरकडून नृत्याचं प्रशिक्षणही घेतलं आहे.

  • Share this:

काय पो छे, शुद्ध देसी रोमान्स आणि एमएस धोनी यांसारख्या सिनेमात काम केल्यानंतर केदारनाथ सिनेमातून सुशांतने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केलं. २१ जानेवारीला सुशांत त्याचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.

‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सुशांतने अभिनयाची सुरुवात थिएटरपासून केली. मात्र बालाजी टेलिफिल्मने त्याच्यातील सुप्तगुण ओळखले आणि त्याला किस देश में है मेरा दिल मालिकेत छोटी भूमिका दिली.

या मालिकेतली त्याची भूमिका लवकर संपली, मात्र चाहत्यांमधील त्याची लोकप्रियता पाहून त्याच्या व्यक्तीरेखेची मालिकेत पुन्हा एन्ट्री करण्यात आली.

सुशांत फक्त अभिनयातच नाही तर अभ्यासातही हुशार आहे. AIEEE परीक्षेत संपूर्ण देशात त्याचा सातवा क्रमांक आला होता. यानंतर त्याने मॅकेनिकल इंजीनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. चार वर्ष अभ्यास केल्यानंतर अभिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने शिक्षण अर्धवट सोडलं.

सुशांत सिंग राजपूतला गाड्यांची प्रचंड आवड आहे. अभिनेता झाल्यावर सर्वात महागड्या गाड्या विकत घेण्याचं त्याचं स्वप्नही त्याने पूर्ण केलं.

सुशांतकडे रेंज रोवर SUV आणि BMW 1300 R बाइक आहे. पण, या सगळ्यात त्याचं स्वप्न तेव्हा पूर्ण झालं जेव्हा त्याने Maserati विकत घेतली. सुशांत याचे फोटो सोशल मीडियावरही शेअर केले होते.

सुशांतला आयुष्य भरभरून जगायला आवडतं. अभिनय, नृत्य याशिवाय त्याला दिग्दर्शनातही रस आहे. सुशांतने 'राजः द मिस्ट्री कंटिन्यू' या सिनेमात मोहित सुरीसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. या सिनेमात कंगना रणौत आणि इमरान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका होत्या.

बॉलिवूडचा हा अष्टपैलू अभिनेता फिटनेसकडेही लक्ष देतो. जिममध्ये तासन् तास घाम गाळण्यापेक्षा तो स्वतःला फिट ठेवण्यासाठी बॅले डान्सही करतो. याशिवाय त्याने शामक दावरकडून नृत्याचं प्रशिक्षणही घेतलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2019 01:26 PM IST

ताज्या बातम्या