मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

एकुलतं एक मुल म्हणजे ते असंच असणार! नाही, जनरल दृष्टीकोन खोटा ठरवणारा निष्कर्ष

एकुलतं एक मुल म्हणजे ते असंच असणार! नाही, जनरल दृष्टीकोन खोटा ठरवणारा निष्कर्ष

सिंगल चाईल्ड मुलांची मानसिकता

सिंगल चाईल्ड मुलांची मानसिकता

भावंडाशिवाय आपलं मूल पुढं आयुष्यात एकटं पडेल का? या सारखे प्रश्न पालकांना सतावत असतात. सध्याच्या युगात एकट्या मुलाच्या पालकांना काही गोष्टींचा त्रास होतो आणि ते मुलाच्या भविष्याबद्दल अपराधीपणाने जगू लागतात. पण,..

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 23 नोव्हेंबर : एकच मूल असण्याचा आपला निर्णय चुकला की काय? अशी चिंता अनेक पालकांना असते. भावंडाशिवाय आपलं मूल पुढं आयुष्यात एकटं पडेल का? या सारखे प्रश्न पालकांना सतावत असतात. सध्याच्या युगात एकट्या मुलाच्या पालकांना काही गोष्टींचा त्रास होतो आणि ते मुलाच्या भविष्याबद्दल अपराधीपणाने जगू लागतात. पण, आम्ही तुम्हाला सांगतो की विज्ञान एकुलत्या एक मुलाच्या बाबतीत वेगळे तथ्य मांडते. CafeMom मध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, एकटं मुल असण्याचा त्यांच्या भविष्यातील वागण्यावर परिणाम होत नाही. भावंड असण्याचे फायदे असतील तर त्याचे तोटेही अनेक असू शकतात.

अधिक आनंदी -

असे मानले जाते की, ज्या मुलांना भाऊ-बहीण आहेत ते अधिक आनंदी असतात. तर इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की, भावंडांमधील स्पर्धेमुळे मुलांच्या आनंदात अनेक वेळा घट होते. एवढेच नाही तर, भाऊ-बहिणींसोबत असलेल्या अर्ध्याहून अधिक मुलांना त्यांच्याच भावाने किंवा बहिणीचा त्रास होत असल्याचेही या अभ्यासात आढळून आले. त्यामुळे असे म्हणता येईल की एकटी मुले त्यामुळे अधिक आनंदी आहेत.

बालपणात सोशल कौशल्यांचा अभाव -

संशोधनात असे आढळून आले आहे की, भावंडांशिवाय राहणाऱ्या मुलांमध्ये इतरांपेक्षा कमी सामाजिक कौशल्ये असतात. त्यांना सहज मित्र बनवता येत नाहीत आणि त्यांना शाळेत खेळताना किंवा नर्सरीमध्ये समस्यांना सामोरं जावं लागतं.

घटस्फोट होण्याची अधिक शक्यता

जेव्हा मुले आपल्या आई-वडिलांसोबत भावंडांशिवाय राहतात, तेव्हा ते त्यांच्या पालकांचे जीवन अधिक जवळून पाहतात आणि अनुभवतात. सिंगल चाईल्ड अशा मुलांमध्ये त्यांच्या आयुष्यात घटस्फोटाची शक्यता अधिक असल्याचे ओहियो स्टेट संशोधनात आढळून आलं आहे.

हे वाचा - पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष; वेळीच उपचार न केल्यास उद्भवू शकते गंभीर परिस्थिती

चांगला शैक्षणिक रेकॉर्ड

संशोधकांचे म्हणणे आहे की, कुटुंबाचा आकार जसजसा वाढत जातो, तसतसे पालक प्रत्येक मुलाशी शाळेबद्दल कमी बोलतात, त्यांच्या शैक्षणिक अपेक्षा कमी असतात, महाविद्यालयासाठी बचत होते आणि कमी शैक्षणिक साहित्य उपलब्ध असते. परंतु, एकाच मुलाच्या बाबतीत असं होत नाही आणि त्यामुळे त्यांचा शैक्षणिक रेकॉर्ड चांगला राहतो.

मैत्री खूप मनापासून करतात

ज्या मुलांना भावंडं नसतात त्यांना एकटं वाटतं असं म्हणतात. पण, अशा मुलांची मैत्री खूप मनापासून असते आणि ते एखाद्याचे खास मित्र बनतात.

हे वाचा - Google Mapsमध्ये आलंय कामाचं फीचर! मिळेल तुमच्या कारसंबंधी महत्त्वाची माहिती

पौगंडावस्थेतील नैराश्य -

संशोधनात असे आढळून आले आहे की बहुतेक सिंगल चाईल्ड मुले पौगंडावस्थेत नैराश्यात जातात. परंतु, हे सगळ्याच मुलांमध्ये आढळत नाही. मात्र, ही बाब खरी आहे की, जर मुलाला किमान एक बहीण असेल तर त्याला एकटेपणा, अपराधीपणा, निराशा कमी होते.

चांगले गुण -

भाऊ-बहिणी असलेल्या मुलांच्या तुलनेत एकटी मुलं अधिक शिष्टाचार आणि चांगली वागणारी असतात.

First published: