केजरीवालांच्या श्रीमुखात लगावणाऱ्याची पत्नी म्हणाली - मोदींविषयी वाईट ऐकू शकत नाही

केजरीवालांच्या श्रीमुखात लगावणाऱ्याची पत्नी म्हणाली - मोदींविषयी वाईट ऐकू शकत नाही

सुरेशची पत्नी ममताने सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वाईट बोलल्यामुळे ते नाराज होते. त्यामुळे सुरेशने हे पाऊल उचललं.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 मे : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोदीनर येथील कर्मपूरा येथील एका प्रचार सभेत श्रीमुखात लगावली. केजरीवाल आम आदमी पक्षाचे लोकसभेचे उमेदवार गोयल यांच्यासाठी रोज शो करत होते. ज्या व्यक्तीने त्यांना श्रीमुखात लगावली त्याचे नाव सुरेश असे असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणाविषयी बोलताना सुरेशची पत्नी ममताने सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वाईट बोलल्यामुळे ते नाराज होते. त्यामुळे सुरेशने हे पाऊल उचललं. मोदींविषयी वाईट बोललेलं सुरेशला सहन होत नसल्याचंही ममताने सांगितलं.

ममताने पुढे सांगितलं की, 'मोदींविषयी वाईट बोललेलं सुरेशला आवडत नाही. सुरेश यांना PM मोदी यांची टीका सहन होत नाही. काही दिवसांपूर्वी सुरेश याने शिवचरण गोयल यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. तेव्हा गोयल यांनी मोदींवर टीका केली होती. त्यामुळे सुरेश प्रचंड नाराज होते'

जे लोकप्रतिनिधी चांगले काम करणार नाहीत त्यांना जनताच धडा शिकवेल, असे सुरेश म्हणत असे. पण तो कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नसल्याचे त्याच्या एका नातेवाईकाने सांगितले.

अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा हल्ला, 'आप'ने भाजपवर केला आरोप

कर्मपुरा भागात रोड शो करत असताना एका इसमाने त्यांच्यावर हा हल्ला केला.अरविंद केजरवाल मतदारांना अभिवादन करत असताना एक जण त्यांच्या कारवर चढला आणि त्याने त्यांच्या थोबाडीत मारली.

सुरेश नावाच्या या इसमाने हा हल्ला केला, असं पुढे येत आहे. सुरेश हा कैलाश पार्कमध्ये राहणारा आहे. तो स्पेअर पार्ट जोडण्याचं काम करतो. त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

याआधीही हल्ले

अरविंद केजरीवाल यांच्यावर याआधीही अशा प्रकारचे हल्ले झाले आहेत. त्यामुळेच त्यांची सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी आपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. हे हल्लेखोर भाजपशी संबंधित असावेत,असाही आरोप आप च्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

दिल्लीमध्ये गेल्याच आठवड्यात अरविंद केजरीवाल यांच्यावर दक्षिणपुरी भागात असा हल्ला झाला होता.

वाराणसीत शाईहल्ला

मागच्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीमध्येही अरविंद केजरीवाल यांच्यावर शाईहल्ला करण्यात आला होता. तसंच त्यांच्यावर बूट फेकण्याचीही घटना घडली होती. केजरीवाल यांच्यावर वारंवार असे हल्ले होत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

VIDEO : किळसवाणा प्रकार, पुण्यातील हाॅस्पिटलमध्ये जेवणात आढळले रक्ताने माखलेले बोळे!

First published: May 4, 2019, 11:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading