सुरेश जैन यांच्या एका वक्तव्याने जळगावात फुटलंय नव्या वादाला तोंड

जळगाव मतदारसंघ शिवसेनेला सुटला तर राजूमामा भोळे यांना आमचे काम करावं लागेल, असे वक्तव्य माजी मंत्री सुरेश जैन यांनी करुन एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. सुरेश जैन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार राजू मामा भोळे सध्या चिंतेत दिसत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2019 03:27 PM IST

सुरेश जैन यांच्या एका वक्तव्याने जळगावात फुटलंय नव्या वादाला तोंड

जळगाव,11 एप्रिल- लोकसभेसाठी आज पहिल्या टप्प्यातलं मतदान होत आहे. विदर्भातील नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माणिकराव ठाकरे, हंसराज अहीर या दिग्गज नेत्यांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.दुसरीकडे, जळगावात आतापासूनच आगामी विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगू लागलीय.

जळगाव मतदारसंघ शिवसेनेला सुटला तर राजूमामा भोळे यांना आमचे काम करावं लागेल, असे वक्तव्य माजी मंत्री सुरेश जैन यांनी करुन एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. सुरेश जैन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार राजू मामा भोळे सध्या चिंतेत दिसत आहेत.

दरम्यान, साडेचार वर्षांनंतर जामिनावर बाहेर आल्यानंतर सुरेश जैन यांनी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा करत भविष्यात केवळ सामाजिक कार्यात सक्रिय राहण्याचे स्पष्ट केले होते. परंतु, महानगरपालिका निवडणुकीत सुरेश जैन पुन्हा सक्रिय झाले होते. त्यामुळे ते विधानसभा लढणार, असे वातावरण तयार झाले आहे.

VIDEO : सुजय विखेंबद्दल शरद पवारांचा मोठा खुलासा

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 03:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...