गुजरात, 23 डिसेंबर : गुजरातच्या डांग जिल्ह्यात खासगी क्लासच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यातील 21 विद्यार्थ्यांना सुरतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुरूकृपा नावाच्या एका खासगी क्लासेसची ही मुलं आहेत. ते पिकनीकसाठी गेले होते.
ही बस 300 फूट खोल दरीत कोसळली. 40ची क्षमता असणाऱ्या बसमध्ये 83 विद्यार्थ्यी जात होते. या अपघाताध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर हा अपघात झाला आहे.
घाटात वळण घेताना कार चालकाचा ताबा सुटला आणि त्यामुळे कार दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे हे विद्यार्थी सुरतहून अमरोली शहरातून डांगला पिकनीकसाठी गेले होते आणि त्याचवेळी त्यांच्या बसला असा भीषण अपघात
झाला आहे.
VIDEO: अमितच्या लग्नाला मोदींना बोलवणार का? राज ठाकरे म्हणतात...