शरद पवारांवरील टीकेवर सुप्रिया सुळे म्हणतात, अपना नाना...!

शरद पवारांवरील टीकेवर सुप्रिया सुळे म्हणतात, अपना नाना...!

अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादी सोडत आहेत या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत सुप्रिया सुळे अगदी कणखर दिसल्या. कार्यकर्त्यांसमोर त्यांनी उत्साह वाढवणारं वक्तव्य केलं.

  • Share this:

हिंगोली, 10 सप्टेंबर : शरद पवारांना राज्याच्या राजकारणात अनन्य साधारण महत्त्व असल्यानंच त्यांच्यावर सातत्यानं टीका केली जाते असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं आहे. तसंच हर्षवर्धन पाटील नेमके राष्ट्रवादीच्या विरोधात का बोलत आहेत हे माहित नसल्याचंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं. त्या हिंगोलीतील वसमत इथं राष्ट्रवादीच्या दौऱ्यादरम्यान बोलत होत्या.

आगामी विधान सभा निवडणुकीचं वातावरण तापत आहे. नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. हिंगोली इथल्या वसमत इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे अशाच दौऱ्यावर आल्या होत्या.

सुप्रिया सुळे यांनी हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या वसमत विधानसभा मतदार संघाचा दौरा केला. या दौऱ्यात सुप्रिया सुळे यांनी पहिल्या बैठकीत डॉक्टर, वकील, व्यापारी आदी लोकांशी संवाद साधला. दुसऱ्या बैठकीत महाविद्यालयीन तरुण-तरुणींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढला हे विशेष. तिसऱ्या बैठकीत त्यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळेंची तीन रूपं पाहायला मिळाली.

अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादी सोडत आहेत या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत सुप्रिया सुळे अगदी कणखर दिसल्या. कार्यकर्त्यांसमोर त्यांनी उत्साह वाढवणारं वक्तव्य केलं. शरद पवार यांच्यावर टीका केली जाते म्हणत त्यांनी 'अपना नाना अभीभी मार्केट मे चलता है' असं आत्मविश्वासाने सांगितलं.

इतर बातम्या - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल बदलणारी बातमी; MIMने वंचितला दिला 'तलाक'

पक्ष कार्यकर्त्यांसमोर 'अपना नाना चालत है 'असं वक्तव्य केल्यानंतर पत्रकार परिषदमध्ये हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये जात असल्याच्या प्रश्नावर मात्र त्या हतबल दिसल्या. हर्षवर्धन पाटील यांना सर्वतोपरी प्रयत्न केले तरीही हे कसं झालं हे देवाला माहित असं दुबळं वक्तव्य त्यांनी केलं.

'भाजपमध्ये जाणारी 'मुलं' वडिलांना दुसऱ्याच्या दारात नेऊन मुजरा करायला लावतात'

इतर बातम्या - शरद पवार दैवत पण..., आणखी एक राष्ट्रवादी आमदार शिवसेनेच्या वाटेवर

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पक्ष सोडून भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांवर सडकून टीका केली. कारखाना, बँक, ED आणि CBI या कारणामुळे लोक सोडून जात असल्याचं आम्हाला सांगत आहेत असंही त्यांनी परभणीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. त्या म्हणाल्या, जे चाललेत ते वडिलांना दुसऱ्याच्या दारात नेऊन मुजरा करायला लावतात. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं हे कपडे बदलल्या प्रमाणे झालं आहे असंही त्यांनी सांगितलं. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. त्या पुढे म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी केली. राज्याचे मुख्यमंत्री एकही दिवस पूर परिस्थिती असलेल्या सांगली आणि कोल्हापूरात राहिले नाहीत. विमानातून आले आणि गाडीतून फिरून गेले. सध्या खरे बोलायची सुद्धा सोय नाही राहिली असंही त्यांनी सांगितलं.

इतर बातम्या - भाजप-सेनेच्या मेगाभरतीमुळे युतीत मोठा ट्विस्ट, असा असेल नवा फॉर्म्युला

VIDEO: युतीच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना खासदार अनिल देसाईंची EXCLUSIVE माहिती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 04:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading