'भाजपमध्ये जाणारी 'मुलं' वडिलांना दुसऱ्याच्या दारात नेऊन मुजरा करायला लावतात'

'भाजपमध्ये जाणारी 'मुलं' वडिलांना दुसऱ्याच्या दारात नेऊन मुजरा करायला लावतात'

'राज्याचे मुख्यमंत्री एकही दिवस पूर परिस्थिती असलेल्या सांगली आणि कोल्हापूरात राहिले नाहीत. विमानातून आले आणि गाडीतून फिरून गेले.'

  • Share this:

परभणी, 10 सप्टेंबर : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पक्ष सोडून भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांवर सडकून टीका केली. कारखाना, बँक, ED आणि CBI या कारणामुळे लोक सोडून जात असल्याचं आम्हाला सांगत आहेत असंही त्यांनी परभणीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. त्या म्हणाल्या, जे चाललेत ते वडिलांना दुसऱ्याच्या दारात नेऊन मुजरा करायला लावतात. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं हे कपडे बदलल्या प्रमाणे झालं आहे असंही त्यांनी सांगितलं. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. त्या पुढे म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी केली. राज्याचे मुख्यमंत्री एकही दिवस पूर परिस्थिती असलेल्या सांगली आणि कोल्हापूरात राहिले नाहीत. विमानातून आले आणि गाडीतून फिरून गेले. सध्या खरे बोलायची सुद्धा सोय नाही राहिली असंही त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल बदलणारी बातमी; MIMने वंचितला दिला 'तलाक'

शिवसेनेचा आणखी एक आमदार 'राष्ट्रवादी'च्या वाटेवर

राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे.  विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात अनेक धक्के बसले. त्यानंतर आता विदर्भातही राष्ट्रवादीतून आऊटगोईंग सुरू झालं आणि आता दक्षिणी महाराष्ट्रातही खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिपक आबा साळुंखे यांनी राजीनामा दिला आहे. सांगोल्याचे माजी आमदार दिलीप आबा साळुंखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

झीरो डिग्री बारमध्ये लहान मुला-मुलींचा धिंगाणा, धाड टाकल्यावर धक्कादायक खुलासा

'मला सांगोला इथून विधानसभा निवडणूक लढवायची आहे. तशी मी पक्षाला मागणी सुध्दा केली. मला उमेदवारी देऊन पक्ष मला न्याय देईल ही अपेक्षा ठेवत आहे. पण मतदारसंघातील काम आणि जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाचं काम या दोन्ही जबाबदाऱ्या पूर्ण करणं शक्य नसल्यानं मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे' असं कारण दिलीप आबा साळुंखे यांनी दिलं. 'शरद पवार हे आमचे दैवत आहेत' असंही ते यावेळी म्हणाले. शरद पवारांवर प्रेम असलं तरी आता दिपक आबा साळुंखे हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

VIDEO: हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीच्या विरोधात का? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर

निवडणुकीच्या तोंडावर सुनील तटकरेंचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अवधूत तटकरे शिवसेनेत 

महाराष्ट्रात सोमवारी आणखी एका पुतण्याची बंडखोरी पाहायला मिळाली. निवडणुकीच्या तोंडावर सुनील तटकरेंचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अवधूत तटकरे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे रायगडात राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अवधुत तटकरे यांनी मातोश्रीवर आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 03:48 PM IST

ताज्या बातम्या