उन्नाव बलात्कार प्रकरणाची दिल्लीत होणार सुनावणी, आरोपी सेंगरची BJPतून हकालपट्टी

उत्तर प्रदेशातील बहुचर्चित उन्नाव बलात्कार प्रकरणाची सुप्रीम कोर्टानं गंभीर दखल घेतली आहे. सुप्रीम कोर्टानं या प्रकरणातील सर्व खटल्यांची सुनावणी उत्तर प्रदेशाबाहेर म्हणजे राजधानी दिल्लीत हलवली आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 02:21 PM IST

उन्नाव बलात्कार प्रकरणाची दिल्लीत होणार सुनावणी, आरोपी सेंगरची BJPतून हकालपट्टी

लखनौ, 1 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील बहुचर्चित उन्नाव बलात्कार प्रकरणाची सुप्रीम कोर्टानं गंभीर दखल घेतली आहे. सुप्रीम कोर्टानं या प्रकरणातील सर्व खटल्यांची सुनावणी उत्तर प्रदेशाबाहेर म्हणजे राजधानी दिल्लीत हलवली आहेत. या बलात्कार प्रकारणाची आतापर्यंतची झालेली तपासणी आणि पीडितेच्या अपघाताचा चौकशी अहवाल दुपारी 12 वाजेपर्यंत सोपवावा, असे आदेश कोर्टानं सीबीआयच्या अधिकाऱ्यांना दिला होता. गुरुवारी (1 ऑगस्ट )दुपारी 12 वाजता सुरू झालेल्या सुनावणीत कोर्टानं स्पष्ट केलं की, उन्नाव प्रकरणासंबंधीत सर्व खटल्यांची सुनावणी यापुढे दिल्लीत होणार. तसंच पीडितेच्या अपघाताची चौकशी सात दिवसांच्या आत करण्यासही सांगितलं. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर उन्नाव बलात्कार प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळेस सरन्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं की दुपारी 12 वाजेपर्यंत सीबीआयच्या जबाबदार अधिकाऱ्याला बोलावू घ्या.

(वाचा : 'त्या' घटनेला वेगळं वळण.. मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला गेलेल्या तरुणीवर गॅंगरेप)

Loading...

(वाचा :  तुला शेवटचं भेटायचंय...; हळदीपूर्वी एक्स बॉयफ्रेंडनं घेतला 'ती'चा जीव)

यावर सॉलिसिटर मेहता म्हणाले...

'प्रकरणाचा तपास करणारे सीबीआय अधिकारी लखनौमध्ये आहेत. दुपारपर्यंत येथे पोहोचणं त्यांच्यासाठी कठीण आहे. त्यामुळे सुनावणी उद्या  घ्यावी', अशी विनंती  मेहता यांनी सरन्यायाधीशांना केली. यावर आता सुनावणी थांबवली जाणार नाही. सीबीआय संचालकांना तपास अधिकाऱ्याकडून फोनवर माहिती घेण्यास सांगा आणि दुपारी 12 वाजेपर्यंत सविस्तर माहिती न्यायालयासमोर ठेवा, असे सरन्यायाधीशांनी मेहता सांगितलं.

(पाहा : मुंबई लोकलमध्ये 'पोलडान्स' करत तरुणाची स्टंटबाजी, VIDEO व्हायरल)

आरोपी कुलदीप सेंगरची भाजपतून हकालपट्टी

दरम्यान, या बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंह सेंगर याची भाजपानं हकालपट्टी केल्याची माहिती समोर आली आहे. पण पक्षाकडून याबाबतची कोणतीही जाहीर केलेली नाही. उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांचा भीषण अपघात झाल्यानंतर आता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि भाजपवर चौफेर टीका होत आहे.

'पतली कमर'वर महिला पोलिसांचा TIKTOK व्हिडिओ व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 02:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...