पीएम नरेंद्र मोदी बायोपिकवर या तारखेला होणार अंतिम निर्णय

पीएम नरेंद्र मोदी बायोपिकवर या तारखेला होणार अंतिम निर्णय

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सिनेमा पाहून झाल्यावर निवडणूक आयोगाने आपलं उत्तर सर्वोच्च न्यायालयाकडे जमा केलं आहे.

  • Share this:

मुंबई, २२ एप्रिल- विवेक ओबेरॉय स्टारर पीएम नरेंद्र मोदी सिनेमाला प्रदर्शनासाठी अजून तारीख मिळत नाहीये. सुरुवातीला हा सिनेमा ११ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र विरोधी पक्षाने सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध केल्यामुळे सिनेमाचं प्रदर्शन रोखण्यात आलं. सिनेमाच्या निर्मात्यांनी या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने सिनेमाच्या प्रदर्शनावरील निर्णय निवडणूक आयोग घेणार असल्याचं स्पष्ट केलं. तसेच आयोगाने सिनेमा पाहून हा सिनेमा आचार संहितेचं उल्लंघन करतो की नाही याचा निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं.

याशिवाय विरोधकांच्या आरोपांनुसार, या सिनेमामुळे भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत मदत होऊ शकते. या सर्व वादविवादात निवडणूक आयोगाने खास स्क्रीनिंगमध्ये हा सिनेमा पाहिला. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सिनेमा पाहून झाल्यावर निवडणूक आयोगाने आपलं उत्तर सर्वोच्च न्यायालयाकडे जमा केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सिनेमावरच्या सुनावणीसाठी २६ एप्रिल ही तारीख दिली आहे. तसेच न्यायालयाने निर्मात्यांनाही रिपोर्ट दाखवण्याची विनंती केली आहे.

श्रीलंकन अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने बॉम्ब हल्ल्यानंतर केली ‘ही’ मागणी


दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सिनेमावर गंभीर आरोप केले होते. मनसेने म्हटलं होतं की, कोणताही सिनेमा प्रदर्शित होण्याच्या ५८ दिवस आधी त्याची कॉपी सेन्सॉर बोर्डाला द्यावी लागते. असा नियम असतानाही मोदींच्या आयुष्यावर तयार करण्यात आलेल्या या सिनेमाला विशेष सूट देण्यात आली.

श्रीलंका बॉम्बस्फोटात थोडक्यात बचावली ही अभिनेत्री, ऋषी कपूरसोबतही केलंय काम

पीएम नरेंद्र मोदी सिनेमाची घोषणा जानेवारी महिन्यात करण्यात आली. त्यानंतर अवघ्या ३९ दिवसांमध्ये सिनेमा संपूर्ण चित्रीत करून तो प्रदर्शनासाठीही तयार झाला. या परिस्थितीत मनसेने सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांकडे राजीनाम्याची मागणी केली.

VIDEO- गच्चीवर विक्रांतला किस करताना दिसली दीपिका पदुकोण, ‘छपाक’चा सीन व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 02:18 PM IST

ताज्या बातम्या