भारतात मुली असुरक्षितच, 6 महिन्यात 24 हजार मुली ठरल्या लैंगिक अत्याचाराच्या बळी!

भारतात मुली असुरक्षितच, 6 महिन्यात 24 हजार मुली ठरल्या लैंगिक अत्याचाराच्या बळी!

सर्वोच्च न्यायालयाने समोर आणलेल्या या आकड्यांवरून भारतात अद्याप मुली सुरक्षित नाहीतच असं चित्र आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 जुलै : गेल्या सहा महिन्यांमध्ये 24 हजार मुलींवर लैगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत सुमोटो याचिका दाखल केली आहे. 1 जानेवारी ते 30 जून दरम्यान अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या 24 हजार 212 घटना समोर आल्याचं न्यायलयातील आकड्यांवरून समोर आलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने समोर आणलेल्या या आकड्यांवरून भारतात अद्याप मुली सुरक्षित नाहीतच असं चित्र आहे.  अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या सर्वाधिक घटना या उत्तर प्रदेशात घडल्या आहेत. उत्तर प्रदेशात यासंदर्भातील 3 हजार 457 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात महिला सुरक्षित नाही आहेत.

आतापर्यंत यापैकी 115 तक्रारींवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या 1 हजार 940 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. खरंतर, लैंगित अत्याचार झाल्याच्या या घटना समोर आल्या आहेत. पण अशा अनेक घटना आहेत ज्या अद्याप समोर आलेल्या नाहीत. देशातील लैंगिक अत्याचाराचं हे प्रमाण थांबणं महत्त्वाचं आहे.

मुलींना प्रौढ बनवण्यासाठी औषधं देणाऱ्यांविरोधात होणार कडक कारवाई

अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण तसंच बलात्कारासारख्या घटना रोखण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने पोस्को कायद्यात सुधारणा केल्या आहेत.  यामध्ये महिला आणि बाल कल्याण मंत्रालयानं चाइल्ड पॉर्नोग्राफीला आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाई आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली आली आहे. या सुधारणा संसदेत मांडलेल्या नवीन पोस्को बिलमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. फोटो, डिजिटल पॉर्नोग्राफीवरही आळा घालण्यासाठी मंत्रालयानं तरतूदी केल्या आहेत. जर हे बिल पारित करण्यात आलं तर या सर्व बाबी POCSO कायद्यानुसार दंडनीय असतील. महिला आणि बाल कल्याण मंत्रालयानं बाल लैंगिक गुन्हे संरक्षण कायद्यांतर्गत अश्लील कार्टून आणि अश्लील अ‍ॅनिमेटेड फोटोदेखील दंडनीय गुन्ह्यांच्या श्रेणीत आणण्याची बाब नमूद केली आहे.

नवीन POCSOअ‍ॅक्टनुसार जर एखादी व्यक्ती अश्लील व्हिडीओ किंवा फोटोमध्ये लहान मुलांची नक्कल करत अश्लील कृत्य करताना आढळल्यास याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल. तसंच अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीची सर्व माहिती सरकारकडे नोंद करण्यात येणार आहे.

लहान मुलांना लवकर प्रौढ करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल तसंच औषधांचा वापर करणाऱ्यांविरोधातही कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, ही सुधारणादेखील महिला आणि बाल कल्याण विकास मंत्रालयानं POCSO कायद्यांतर्गत आणण्यास सांगितली आहे. कोणतीही व्यक्ती जर एखाद्या लहान मुलीला किंवा मुलाला प्रौढ करण्यासाठी औषधं तसंच इंजेक्शन देण्याचा गुन्हा करत असेल तर त्याला कमीत कमी 5 वर्षांची शिक्षा करण्यात येईल. ही शिक्षा वाढवून 7 वर्षांपर्यंतही करण्यात येईल. शिवाय, केलेल्या गुन्ह्यासाठी दंडदेखील भरावा लागेल. तसंच हा गुन्हा करण्यास एखाद्याला प्रेरित केल्यास, यासाठी आमिष दिल्यास किंवा एखाद्याला मजबुरीनं हे वाईट कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्याविरोधातही हीच शिक्षा लागू केली जाईल.

SPECIAL REPORT: वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियात फूट?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2019 02:34 PM IST

ताज्या बातम्या