अर्णब गोस्वामींना सुप्रीम कोर्टाचा झटका, FIR रद्द करण्यास नकार

अर्णब गोस्वामींना सुप्रीम कोर्टाचा झटका, FIR रद्द करण्यास नकार

गोस्वामी यांनी या याचिकेमध्ये सर्व एफआयआर रद्द करावे आणि महाराष्ट्र पोलिसांकडून संपादक आणि इतर कर्मचाऱ्यांना अटक होऊ नये, अशी मागणी केली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 डिसेंबर : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी जामिनावर सुटलेले रिपब्लिक टीव्ही (Republic TV) चे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दणका दिला आहे. रिपब्लिक टीव्हीवरील सर्व गुन्हे मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

अर्णब गोस्वामी यांनी रिपब्लिक टीव्हीवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावे, अशी मागणी याचिकेतून केली होती. त्याचबरोबर या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी करावी, अशीही मागणीही गोस्वामी यांनी केली होती. आज या याचिकेवर न्यायमूर्ती जस्टीस चंद्रचुड यांच्यासमोर सुनावणी झाली.

'दिलीप कुमार यांची तब्येत नाजूक, त्यांच्यासाठी प्रार्थना करा', - सायरा बानो

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्याबद्दल स्पष्ट नकार दिला आहे. ही याचिकाही  फेटाळून लावण्यात आली आहे. तसंच रिपब्लिक टीव्हीवरील गुन्हे रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

गोस्वामी यांनी या याचिकेमध्ये सर्व एफआयआर रद्द करावे आणि महाराष्ट्र पोलिसांकडून संपादक आणि इतर कर्मचाऱ्यांना अटक होऊ नये, अशी मागणी केली होती. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास हा मुंबई पोलिसांऐवजी सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी अनैसर्गिक असल्याचे सांगून सुनावणी करण्यास नकार दिला.

धक्कादायक! महिलांचे अश्लील फोटो काढण्यासाठी शूटमध्ये लावला छुपा कॅमरा आणि...

दरम्यान, मागील महिन्यात 4 नोव्हेंबर रोजी  अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबईतील राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अलिबागला नेण्यात आले होते. अलिबाग कोर्टात हजर केल्यानंतर गोस्वामी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. पण, हायकोर्टाने जामीन देण्यास नकार दिला होता. हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर 11 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना जामीन मंजूर केला होता.

Published by: sachin Salve
First published: December 7, 2020, 1:27 PM IST
Tags:

ताज्या बातम्या