• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • न्यायाधीश कर्नन यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

न्यायाधीश कर्नन यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

त्यांना लवकरत लवकर अटक करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

  • Share this:
09 मे : सुप्रीम कोर्टाने कोलकात्ता हायकोर्टाचे न्यायाधीश न्या. सी. एस. कर्नन यांना अवमानना केल्या प्रकरणी दोषी धरलं असून सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांना लवकरत लवकर अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहे. पदावर असताना तुरुंगवासाची शिक्षा झालेले कर्नन हायकोर्टाचे पहिले न्यायाधीश आहेत. न्यायपालिकेतील भरतीमध्ये भ्रष्टाचार चालतो अशी तक्रार त्यांनी पत्र लिहून पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली होती.  तसंच काल त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांसह आठ न्यायाधीशांना एक आदेश काढून तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे शिक्षा सुनावण्यात आली आहे. वादग्रस्त न्यायाधीश कर्नान यांनी देशाचे सरन्यायाधीश आणि सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायमूर्तींविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ (अॅट्रॉसिटी) आणि त्याचा सुधारणा कायदा 2015 अन्वये स्वत:हून खटला दाखल केला होता. तसंच, या प्रकरणी सुनावणीसाठी वारंवार या न्यायाधीशांना समन्सही बजावलं होतं. काल या सर्वांना 5 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावून न्या. कर्नान यांनी खळबळ उडवली होती. स्वाभाविकच, सुप्रीम कोर्ट विरुद्ध कर्नान हा वाद चिघळला होता. अखेर, त्यांच्याकडून सातत्याने न्यायव्यवस्थेविरोधात होत असलेल्या वक्तव्यांची गंभीर दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयानं त्यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीय.
First published: