मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मोठी बातमी! सुप्रीम कोर्टानं बदलला जगन्नाथ यात्रेचा निर्णय, अखेर दिली परवानगी

मोठी बातमी! सुप्रीम कोर्टानं बदलला जगन्नाथ यात्रेचा निर्णय, अखेर दिली परवानगी

ओडिशातील भगवान जगन्नाथ रथयात्रेचा (Jagannath Puri Rath Yatra)मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

ओडिशातील भगवान जगन्नाथ रथयात्रेचा (Jagannath Puri Rath Yatra)मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

ओडिशातील भगवान जगन्नाथ रथयात्रेचा (Jagannath Puri Rath Yatra)मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

नवी दिल्ली, 22 जून: ओडिशातील भगवान जगन्नाथ रथयात्रेचा (Jagannath Puri Rath Yatra) मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टानं जगन्नाथ रथ यात्रा रद्द केल्याचा निर्णय अखेर सोमवारी बदलला आहे. सुप्रीम कोर्टानं जगन्नाथ रथ यात्रेस परवानगी दिली. सुप्रीम कोर्ट रथयात्रा मायक्रोमॅनेज करणार नाही. आता राज्याच्या शहाणपणावर सोडू, असही कोर्टानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. जगन्नाथ मंदिर समिती आणि राज्य सरकार सहकार्य करेल. यात्रेत लोकांची गर्दी नसल्याचं ओडिशा सरकारनं सुनिश्चित केलं आहे. जगन्नाथ यात्रेमुळे कोरोनाचा धोका वाढणार नाही, अशी काळजी घ्यावी, असं सुप्रीम कोर्टानं ओडिशा सरकारला बजावलं आहे. हेही वाचा...कारगिलचे हीरो LAC वर तैनात; भारतातील ही शक्तीशाली तुकडी चीनला शिकवणार धडा जगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समितीचं म्हणणे आहे की, ते राज्यातील मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने रथयात्रा काढणार आहे. यात्रा समिती तसेच केंद्र सरकारशी समन्वय साधणार असल्याचं ओडिशा सरकारनं सुप्रीम कोर्टात सांगितलं आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या भगवान जगन्नाथांची रथयात्रा सुप्रीम कोर्टानं रद्द केली होती. यात्रेली परवानगी दिली तर भगवान जगन्नाथ आम्हाला क्षमा करणार नाही, असंही कोर्टानं आपल्या आदेशात म्हटलं होतं. मात्र, कोर्टाच्या यानिर्णयाला आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टानं पुर्नविचार करावा, असं याचिकेत म्हटलं होतं. दरम्यान, यात्रा काढण्यावरून 16 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. ज्याच्यावर न्यायाधीश एस. रवींद्र भट पुर्नविचार करणार असल्याचं सांगण्यात येत होतं. हेही वाचा...मोदी सरकारच्या या मोठ्या निर्णयाविरोधात आदित्य ठाकरेंनी थोपटले दंड जगन्नाथ रथ यात्रा ही ओडिशाची जगप्रसिद्ध यात्रा असून यावर्षी 23 जून मंगळवारी सुरू होणार होती. परंतु सुप्रीम कोर्टानं या यात्रेवर बंदी घातली आहे. कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता कोर्टाने भाविकांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. एकाच ठिकाणी जमण्यास परवानगी दिली नव्हती.
First published:

पुढील बातम्या