Home /News /news /

Supreme Court on NEET : यंदाची नीट परीक्षा पुढे ढकलणार का? याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

Supreme Court on NEET : यंदाची नीट परीक्षा पुढे ढकलणार का? याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

सर्वोच्च न्यायालय नीट परीक्षा (Supreme Court on NEET Exam) पुढे ढकलण्याची मागणी करण्याबाबतची याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.

  नवी दिल्ली, 13 मे : सर्वोच्च न्यायालय नीट परीक्षा (Supreme Court on NEET Exam) पुढे ढकलण्याची मागणी करण्याबाबतची याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी 21 मे रोजी होणाऱ्या नीट पीजी परीक्षा 2022 ला पुढे ढकलण्यात यावी, ही याचिका फेटाळण्यात आली आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठाने यावर निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या पीठाने काय म्हटले? हे हितसंबंधांच्या संघर्षाचे प्रकरण आहे. याचा फटका लाखो लोकांना बसणार आहे. परीक्षा पुढे ढकलल्याने अभ्यासक्रमाला उशीर होईल आणि निवासी डॉक्टरांची कमतरता भासू शकते. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठाने म्हटले की, ते परीक्षा पुढे ढकलण्याच्या सूचना देऊ शकत नाहीत. यामुळे नोंदणी करून तयारी केलेल्या लाखो उमेदवारांची अडचण होईल. त्यामुळे परीक्षा ही 21 मेला होणार आहे. हेही वाचा - Raipur Helicopter Crash : छत्तीसगडमध्ये मोठी दुर्घटना, रायपूर विमानतळावर हेलिकॉप्टर क्रॅश
  ....न्यायालय हस्तक्षेप करणार नाही -
  सुनावणीदरम्यान, याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील राकेश कुमार खन्ना यांनी NEET 2021 समुपदेशनातील विलंबाचा मुद्दा उपस्थित केला आणि उमेदवारांना अडचणी येत असल्याचे सांगितले. समुपदेशनात सहभागी झाल्यामुळे ते परीक्षेला बसू शकणार नाहीत. त्यामुळे परीक्षा आठ ते दहा आठवडे पुढे ढकलण्यात यावी.
  यावर एएसजीने न्यायालयाला सांगितले की, २.६ लाख विद्यार्थी तयारी करत आहेत. यावर खन्ना म्हणाले की, त्यांना बहुमताने परीक्षा पुढे ढकलायची आहे. त्यांनी पंतप्रधानांना पत्रही लिहिले आहे. यावर पीठाने म्हटले की, जर सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला तर ते चांगले होईल. परंतु सर्वोच्च न्यायालय असे निर्देश देऊ शकत नाही. NEET 2022 ला 2021 शी जोडणे देखील योग्य नाही. गेल्या अनेक दिवसांपासून नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती. ही परीक्षा पुढे ढकला अशी मागणी करणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court on NEET PG 2022 Exam) दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने आज ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे परीक्षा ठरलेल्या वेळेनुसारच म्हणजे 21 मेला होणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Exam, Supreme court

  पुढील बातम्या