अयोध्या प्रश्नावरील हिंदू महासभेची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

अयोध्या प्रश्नावरील हिंदू महासभेची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

अयोध्या प्रकरणाची सुनावणी लवकरण घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 नोव्हेंबर : अयोध्या प्रकरणाची सुनावणी लवकरण घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. हिंदू महासभेनं ही याचिका केली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला.


राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सुनावणीची तारीख जानेवारीत निश्चित करण्यात येईल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. त्यावर हिंदू महासभेकडून सुनावणी लवकर घेण्यात यावी अशी याचिका दाखल करण्यात आली. मात्र ती याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.


ऑक्टोबरमध्ये सुप्रीम कोर्टाने राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वाद प्रकरणातली सुनावणी जानेवारी 2019 पर्यंत थांबवली आहे. जानेवारी 2019 मध्ये सीजेआय रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायाधीशांच्या समोर या प्रकरणात सुनावणी होणार आहे.


दरम्यान, कोर्टाने सुनावणीच्या तारखांची घोषणा केलेली नाही. या तारख्या जानेवारीमध्ये जाहीर केल्या जातील. राम जन्मभूमी आणि बाबरी मशीदीच्या जमीनीला 3 भागांत विभागणाऱ्या 2010 च्या इलाहाबाद हायकोर्टाच्या विरोधात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.


VIDEO : वाघाने केला पर्यटकांचा पाठलाग, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2018 02:10 PM IST

ताज्या बातम्या