'पद्मावती' सिनेमावर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

'पद्मावती' सिनेमावर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

सेन्सॉर बोर्डाने मंजूरी देण्याआधीच पद्मावती चित्रपटावर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय. राजपूतांची राणी पद्मावती हिच्या जीवनावर आधारित या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्यं असल्याचा आरोप करत याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती

  • Share this:

20 नोव्हेंबर, नवी दिल्ली : सेन्सॉर बोर्डाने मंजूरी देण्याआधीच पद्मावती चित्रपटावर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय. राजपूतांची राणी पद्मावती हिच्या जीवनावर आधारित या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्यं असल्याचा आरोप करत याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. पण सुप्रीम कोर्टाने ही याचिकाच फेटाळून लावलीय. सेन्सॉर बोर्डाने एखाद्या चित्रपटाला मंजुरी दिल्यानंतरच सुप्रीम कोर्ट त्याबाबत काही निर्णय देऊ शकतं, असं मत न्यायाधिशांनी पद्मावती चित्रपटाच्या वादासंदर्भात नोंदवलंय.

दरम्यान, मध्यप्रदेश सरकारने मात्र, हा पद्मावती सिनेमा रिलीज होण्याआधीच त्याच्या प्रदर्शनावर बंदी घातलीय. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे आणि उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनीही चित्रपटाला राजपूत समाजाकडून होणारा वाढता विरोध लक्षात घेऊन या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारला केलाय.

ख्यातनाम दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांनी चित्रपट बनवला असून त्यात दीपिका पदुकोण राणी पद्मावतीच्या भूमिकेत आहे. तर रणवीर सिंह उल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत आहे. या दोघांमध्ये काही 'ड्रीमबेड सीन्स' असल्याचा आरोप करत करणी सेनेनं पद्मावती सिनेमाविरोधात जोरदार निदर्शनं सुरू केलीत. हा वाढता विरोध लक्षात घेऊनच हा सिनेमा रिलीज करणाऱ्या वायकॉम 18 या कंपनीने पद्मावतीचं प्रदर्शन अनिश्चित काळासाठी पुढे ढकललं आहे. येत्या 1 डिसेंबरला हा बहुचर्चित सिनेमा रिलीज होणार होता.

दरम्यान, गुजरात निवडणुकीतील मुख्य मुद्यांना सोईस्कर बदल देता यावी, यासाठीच काही हिंदुत्ववादी संघटनांनी जाणीवपूर्वक या इतिहासकालीन पद्मावती सिनेमाला विरोध करण्याचा पब्लिसिटी स्टंट सुरू केल्याचा आरोप भाजप विरोधकांकडून केला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2017 05:59 PM IST

ताज्या बातम्या