S M L

कोर्टरूम म्हणजे मासळीचा बाजार नव्हे ; सुप्रीम कोर्ट वकिलांवर संतापले

सुप्रीम कोर्टाच्या कोर्टरूमला मासळी बाजार बनवू नका, अशा कठोर शब्दात न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी लोया प्रकरणातील बॉम्बे लॉयर्स असोशिएशनचे वकील दुष्यंत दवे यांना फटकारलं. विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जस्टिस लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय.

Chandrakant Funde | Updated On: Feb 6, 2018 12:06 PM IST

कोर्टरूम म्हणजे मासळीचा बाजार नव्हे ; सुप्रीम कोर्ट वकिलांवर संतापले

06 फेब्रुवारी, नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या कोर्टरूमला मासळी बाजार बनवू नका, अशा कठोर शब्दात न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी लोया प्रकरणातील बॉम्बे लॉयर्स असोशिएशनचे वकील दुष्यंत दवे यांना फटकारलं. विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जस्टिस लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू झालीय. या सुनावणी दरम्यान युक्तीवाद करताना ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे हे मध्येच उठून मोठ्या आवाजात आरडाओरडा करून बोलत होते. त्यावर सुप्रीम कोर्टाने ही उद्विग्न प्रतिक्रिया नोंदवलीय.

जस्टिस लोया मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी महाराष्ट्रातील पत्रकार बंधूराज लोणे आणि बॉम्बे लॉयर्स असोसिएशनकडून स्वतंत्रपणे याचिका दाखल झाल्यात. याच दोन याचिकांच्या एकत्रित सुनावणीदरम्यान लोणे यांचे वकील पल्लव सिसोदिया तर बॉम्बे असोसिएशनचे वकील दुश्यंत दवे यांच्यात हा शाब्दिक फैरी झडत होत्या. त्यावरून कोर्टाने ही नाराजी व्यक्त केलीय. या प्रकरणाची पुढची सुनावणी 9 फेब्रुवारीला होणार आहे. या खटल्यात सरकारची बाजू ख्यातनाम वकील हरिष साळवे मांडत आहेत तर व्ही गिरी हे काँग्रेस समर्थक तहसीन पुनावाला यांच्याबाजूने युक्तीवाद करताहेत.

जस्टिस लोया प्रकरणाची ही सुनावणी सरन्यायाधीश न्यायाधीश दीपक मिश्रा, आणि डी. वाय. चंद्रचूड, ए. एम. खानविलकर या दोन मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2018 12:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close