दिल्लीतलं प्रदूषण कमी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाची 4 राज्यांना नोटीस

दिल्लीतलं प्रदूषण कमी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाची 4 राज्यांना नोटीस

देशाची राजधानी नवी दिल्लीतलं वायू प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारसह आजूबाजूच्या 4 राज्यांनी तात्काळ उपाययोजना कमी कराव्यात, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने काढलेत. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारसह दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांनाही नोटीस पाठवल्यात.

  • Share this:

13 नोव्हेंबर, नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्लीतलं वायू प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारसह आजूबाजूच्या 4 राज्यांनी तात्काळ उपाययोजना कमी कराव्यात, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने काढलेत. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारसह दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांनाही नोटीस पाठवल्यात. दिल्ली आणि परिसरातलं प्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्यावरील धुळ हटवावी, अशी सूचना सुप्रीम कोर्टाने केलीय. तसंच दिल्ली सरकारनं सौर उर्जा आणि ई-रिक्षात वाढ केली पाहिजे, असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलंय.

दिल्लीत सध्या वायू प्रदुषण धोक्याच्या पातळीवर पोहोचलंय. त्यापार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने हे तातडीचे आदेश दिलेत. मध्यंतरी दिल्ली सरकारने शहरातलं वाढतं प्रदूषण कमी करण्यासाठी सम - विषमचा प्रयोग करून पाहिला होता. पण हा आदेश लागू करताना सरकारने दूचाकी स्वार, महिला वाहनचालक आणि व्हीआयपीने वगळल्याने त्याविरोधात अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. तसंच हरित लवादानेही या सम-विषम प्रयोगाला स्थगिती दिल्याने दिल्ली सरकारने तो आदेश मागे घेतला. त्यामुळे दिल्लीत वाढत्या प्रदूषणावर कोणत्याच ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. म्हणूनच सरकार दिल्लीत पुन्हा सम-विषमचा प्रयोग राबवणार का ? याकडेही सगळ्यांचे लक्षं लागलंय.

मध्यंतरी दिल्ली -आग्रा हायवेवरही दाट धुक्यामुळे एकाचवेळी तब्बल 24 गाड्या एकमेकांवर आदळल्या होत्या. तसंच दिल्ली शहरातही वाढत्या प्रदूषणामुळे रहिवाशांना श्वसनाचे त्रास वाढू लागलेत. दिल्लीत सर्वाधिक चार चाकी वाहनं असल्यामुळे शहराच्या वायू प्रदूषणात मोठी वाढ झालीय.

First published: November 13, 2017, 5:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading