दिवाळीत फटाके वाजवण्याच्या वेळा राज्य सरकारनं ठरवाव्यात, सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णयात बदल

दिवाळीत फटाके वाजवण्याच्या वेळा राज्य सरकारनं ठरवाव्यात, सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णयात बदल

मात्र दिवसभरात 2 तास फटाके वाजवण्याची अट कायम

  • Share this:

नवी दिल्ली, ०१ ऑक्टोबर २०१८- फटाके वाजवण्याच्या निर्णयाच्या अटींमध्ये शिथिलता दाखवत सुप्रीम कोर्टानं काहीसा दिलासा दिला आहे. फटाके वाजवण्याची वेळ ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिला. याआधी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार केवळ रात्री ८ ते १० दरम्यानच फटाके वाजवण्याची मुभा होती. मात्र महाराष्ट्रात अभ्यंग स्नानानंतर दिवाळी साजरी केली जाते. त्यामुळे राज्य सरकार पहाटेच्या वेळी फटाके वाजवण्याची मुभा देऊ शकते. मात्र दिवसभरात केवळ दोनच तास फटाके फोडता येतील, हेही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यासंबंधी सुप्रीम कोर्टानं आपल्या निर्णयात काहीसा बदल केला आहे. त्यामुळे दिवाळीत अभ्यंग स्नानाला फटाके फोडण्याची मुभा मिळू शकते. कारण, बदललेल्या निर्णयानुसार राज्य सरकारने फटाके फोडण्याच्या वेळेसंदर्भात निर्णय घ्यावा, असे कोर्टाने सूचवले आहे.

दिवाळीदरम्यान फटाक्यांचा धूर आणि आवाजामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी कमी प्रदूषण करणारे फटाके फोडण्याची परवानगी कोर्टाकडून देण्यात आली होती. पण, त्यासाठी वेळही ठरवून देण्यात आली होती. त्यानुसार, दिवाळीला संध्याकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत फटाके फोडता येतील. तर, इतर सणांसाठी म्हणजेच नवीन वर्ष, नाताळ यासाठी रात्री ११.५५ ते १२.३० या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने आपल्या निर्णयात बदल केला असून दिवाळीसाठी राज्य सरकार फटाके फोडण्याबाबतची वेळ ठरवू शकेल, असे कोर्टाने म्हटले आहे.

असे असले तरी एका दिवसात केवळ दोनच तास फटाके फोडता येतील, हेही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, आता महाराष्ट्र सरकार फटाके फोडण्यासाठी नेमकी कोणती वेळ ठरवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कोर्टाच्या निर्णयानंतर अनेकांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर, काही आमदार आणि खासदारांनी आपण फटाके फोडणारच असा आग्रहदेखील बोलून दाखवला होता.

VIDEO: नगरसेविकेचा स्टंट, आंदोलनासाठी चढली थेट दिव्याच्या खांबावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2018 08:41 AM IST

ताज्या बातम्या