हुंडाविरोधी कायद्याच्या निर्णयात सुप्रीम कोर्टाने केले बदल

हुंडाविरोधी कायद्याच्या निर्णयात सुप्रीम कोर्टाने केले बदल

  • Share this:

नवी दिल्ली,14 सप्टेंबर : हुंडा आणि अत्याचार प्रकरणात आरोपींना तातडीनं अटक करण्याचा निर्णयात सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण बदल केले आहे. कलम 498-अ संबंधित प्रकरणात अंतरिम जामीन देण्यासाठी संरक्षण दिले आहे.

सुप्रीम कोर्टने जुलै 2017 मध्ये कलम 498-अ संबंधित प्रकरणात निर्णय दिला होता. तात्काळ अटक करण्याच्या निर्णयाचा दुरुपयोग होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे तक्रारींची शहानिशा करुनच आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश कोर्टाने जुलै 2017 साली दिले होते. तसंच प्रकरणाच्या चौकशीसाठी प्रत्येक जिल्ह्यात कुटुंब कल्याण समिती स्थापन करण्याचेही निर्देश होते.

मात्र, आज मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश ए. एम. खानविलकर आणि न्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने आधीच्या निर्णयामध्ये बदल करत कुटुंब कल्याण समितीची गरज नसल्याचं स्पष्ट केलंय.

तसंच, याप्रकरणातील पीडितेच्या सुरक्षतेच्या कारणास्तव आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.

First published: September 14, 2018, 7:21 PM IST

ताज्या बातम्या