महाभियोगाच्या नोटीसीवर संविधान पीठात सुनावणी

महाभियोगाच्या नोटीसीवर संविधान पीठात सुनावणी

महाभियोग प्रस्तावाची नोटीस फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान देण्याच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठासमोर सुनावणी होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,07 मे: महाभियोग प्रस्तावाची नोटीस फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान देण्याच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठासमोर सुनावणी होणार आहे.

या सुनावणीसाठी खास संविधान पीठ तयार करण्यात आलं असून त्यात जस्टिस एसए बोबडे, जस्टिस एके सिकरी, जस्टिस एनवी रमन, जस्टिस अरुण मिश्रा आणि जस्टिस एके गोयल यांचा समावेश आहे. महत्वाचं म्हणजे सेवा ज्येष्ठतेनुसार पहिल्या पाच न्यायाधीशांना यात स्थान देण्यात आलेलं नाही.

जस्टिस जे चेलमेश्वर, जस्टिस रंजन गोगोई, जस्टिस मदन बी लोकूर आणि जस्टिस कुरियन जोसेफ यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केल्यानं वाद झाला होता. काँग्रेससहीत सात विरोधी पक्षांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या विरोधात महाभियोगाची नोटीस दिली होती मात्र ती त्यांनी फेटाळून लावली होती.

 

 

First published: May 7, 2018, 9:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading