PM Narenda Modi Biopic: सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका, आता EC घेईल प्रदर्शनावर निर्णय

याआधी सिनेमावर बंदी घालण्यात यावी अशा याचिका मुंबई हायकोर्ट, दिल्ली हायकोर्ट आणि जबलपुर हायकोर्टाने फेटाळल्या होत्या.

News18 Lokmat | Updated On: Apr 9, 2019 04:11 PM IST

PM Narenda Modi Biopic: सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका, आता EC घेईल प्रदर्शनावर निर्णय

मुंबई, ०९ एप्रिल- सुप्रीम कोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक पीएम नरेंद्र मोदी सिनेमाचं चित्रीकरण रोखण्यासाठी करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे. तसेच यासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार निवडणुक आयोगाचा असून त्यांनाच यासंदर्भात निर्णय घ्यावा लागेल असं कोर्टाने स्पष्ट केलं. निवडणुकीच्या काळात अशाप्रकारचे सिनेमे प्रदर्शित करणं हे आचार संहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप सिनेमावर करण्यात आला आहे.कोर्टाने याचिका रद्द करत म्हटले की, सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला सर्टिफिकेटही दिलं नाही. तसेच फक्त निवडणूक आयोगचं हा सिनेमा आचार संहितेचं उल्लंघन करतो की नाही याचा निर्णय घेऊ शकतो. याआधी सिनेमावर बंदी घालण्यात यावी अशा याचिका मुंबई हायकोर्ट, दिल्ली हायकोर्ट आणि जबलपुर हायकोर्टाने फेटाळल्या होत्या. तसेच सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यासही नकार दिला होता. सिनेमाच्या निर्मात्यांनी म्हटल्याप्रमाणे हा सिनेमा आता ११ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात विवेक ओबेरॉयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली आहे.

VIDEO: 'डे विथ लिडर' : असा सुरू होतो नवनीत राणां यांचा दिवस

Loading...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2019 04:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...