मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /त्या पाच जणांना नजरकैदेत ठेवा - सुप्रीम कोर्टाचे आदेश

त्या पाच जणांना नजरकैदेत ठेवा - सुप्रीम कोर्टाचे आदेश

    नवी दिल्ली, ता. 29 ऑगस्ट : पुणे पोलिसंनी अटक केलेल्या सर्व पाचही माओवादी समर्थकांना अटकेत न ठेवता त्यांना 5 सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवावं असा महत्वाचा निकाल सुप्रीम कोर्टानं दिलाय. त्यामुळे पुणे पोलिसांच्या चौकशीला धक्का लागण्याची शक्यता आहे. रोमीला थापर,प्रभात पटनायक,सतिश देशपांडे आणि इतर आणि इतर काही विचारवंतांनी कोर्टात जनहित याचिका दाखल करून अटकेला विरोध केला होता. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी पुढच्या गुरूवारी होणार आहे. मंगळवारी अटक करण्यात आलेल्या माओवादी समर्थक नेत्यांना आज पोलिसांनी पुणे न्यायालयात हजर केलं आणि सर्वांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. माओवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला होता. रोड शोच्या दरम्यान घातपात घडवून राजीव गांधीची ज्या पद्धतीनं स्फोट घडवून हत्या करण्यात आली होती. त्याच पद्धतीने घातपात घडवून आणण्याचा माओवाद्यांचा कट होता अशी खळबळजनक माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. देशाविरूद्ध युद्ध पुकारण्याचा त्यांचा कट होता असंही पुणे पोलिसांनी न्यायालयाला म्हटलं आहे.

    पोलिसांची खळबळजनक माहिती

    • अटक केलेले सर्व जण हे माओवाद्यांचे 'थिंक टँक'. शहरी भागात माओवादी विचार पेरणं हे या 'थिंक टँक'चं काम.

    • 'थिंक टँक'ने धोरणं तयार करायची आणि दुसऱ्या फळीने ती अमंलात आणायची अशी योजना. पुण्यातली एल्गार परिषद ही त्याच योजनेचा भाग.

    • विद्यार्थ्यांचं ब्रेनवॉश करून ते प्रोफेशनल क्रांतिकारी बनतील याची तयारी. विविध परिषदांमधून एवढे टोकाचे विचार मांडायचे की दंगलीला पोषक वातावरण निर्माण होईल.

    • नरेंद्र मोदी सरकारने चळवळींना दडपून टाकण्याचा निर्णय घेतलाय. त्याविरूद्ध आवज उठवला पाहिजे.

     

    First published:

    Tags: Bhimakoregaon, House arrest, Supreme court, पाच अटकेत, भीमा कोरेगाव, सुप्रीम कोर्ट