आता पीएम नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकवर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले हे आदेश

आता पीएम नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकवर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले हे आदेश

कोर्टाने आयोगाला शुक्रवारपर्यंत आपलं उत्तर एका सील बंद पाकिटात द्यायला सांगितले आहे.

  • Share this:

मुंबई, १५ एप्रिल- बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या आगामी पीएम नरेंद्र मोदी या सिनेमावर निवडणूक आयोगाने निवडणुका होईपर्यंत बंदी घातली होती. मात्र आता सुप्रीम कोर्टाने सिनेमावर बंदी घालण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्ट म्हणाले की, हा सिनेमा आचार संहितेचं उल्लंघन करतो की नाही हे जाणून घेतल्यानंतर सिनेमावर बंदी घालण्याचा निर्णय घेऊ शकते. यानंतरच आयोगाने सिनेमावर बंदी घातली होती. अशात आता सुप्रीम कोर्टाने सिनेमाच्या बंदीवर निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा निर्णय घेण्यास सांगितलं आहे.

बायोपिकवर कोर्टाने आयोगाला सिनेमा पाहून निर्णय घेण्यास सांगितले. तसेच कोर्टाने आयोगाला शुक्रवारपर्यंत आपलं उत्तर एका सील बंद पाकिटात द्यायला सांगितले आहे.

१० एप्रिलला निवडणूक आयोगाने सिनेमावर निवडणुका होईपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. बायोपिक किंवा जनतेच्या मतावर परिणाम होईल अशी कोणतीही गोष्ट करण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली. म्हणून पीएम मोदी सिनेमा इलेक्ट्रॉनिक मीडियावर प्रदर्शित करण्यावर बंदी घातली.

या सिनेमात नरेंद्र मोदी यांच्या लहानपणापासून ते पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या सिनेमाचा ट्रेलरही लोकांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला. IMDB ने १० पैकी १० रेटिंग या सिनेमाला दिली आहे.

VIDEO: प्रवाशांनो सावधान! 'जेट' आलं जमिनीवर

First published: April 15, 2019, 3:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading