BS-3 इंजिनाच्या गाड्यांवर बंदी,सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

BS-3 इंजिनाच्या गाड्यांवर बंदी,सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

सर्वोच्च न्यायालयाने येत्या 1 एप्रिलपासून BS-3 इंजिनावर चालणाऱ्या गाड्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे लाखो गाड्या भंगारात गेल्या आहेत.

  • Share this:

29 मार्च : सर्वोच्च न्यायालयानं देशात वाढत असलेल्या प्रदूषणासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय सुनावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने येत्या 1 एप्रिलपासून BS-3 इंजिनावर चालणाऱ्या गाड्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे लाखो गाड्या भंगारात गेल्या आहेत.

येत्या 1 एप्रिलपासून BS-3 उत्सर्जनाचे नियम एप्रिलपासून लागू होणार आहेत. या निर्णयाने वाहन उत्पादक कंपन्यांना मोठा झटका बसला. तब्बल ८.२ लाख वाहनं बीएस-३ या मानकानुसार प्रमाणित केलेली आहेत. तर केंद्राने यावेळेस कार उत्पादक कंपन्यांची बाजू मांडली. कंपन्यांकडे स्टॉकमध्ये असलेल्या BS-3 गाडया विकण्याची परवानगी द्यावी अशी विनंती सरकारने केली पण न्यायालयाने सरकारची याचिका फेटाळून लावली.

First published: March 29, 2017, 8:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading