Pulwama Attack: भारताला उत्तर देण्याचा पूर्ण अधिकार, आम्ही सोबत आहोत- अमेरिका

Pulwama Attack: भारताला उत्तर देण्याचा पूर्ण अधिकार, आम्ही सोबत आहोत- अमेरिका

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांना फोन केला.

  • Share this:

वॉशिंग्टन, 16 फेब्रुवारी: जम्मू्-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांना फोन केला. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी अमेरिका भारतासोबत असल्याचे बोल्टन यांनी सांगितले.

हे देखील वाचा pulwama attack : 7 संशयित ताब्यात, एका स्थानिकाचा शोध सुरू

बोल्टन यांनी डोवल यांना फोन करु शहीद झालेल्या जवानांबद्दल शोक व्यक्त केला. दहशतवादाच्या विरोधात आम्ही भारतासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. जम्मू्-काश्मीरमध्ये झालेल्या घटनेला उत्तर देण्याचा तसेच स्वत:चे संरक्षण करण्याचा भारताला पूर्ण अधिकार असल्याचे बोल्टन यांनी सांगितले. विशेष म्हणजे पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर बोल्टन यांनी दोन वेळा फोनवरून डोवल यांच्याशी चर्चा केली आहे.

दहशतवादाविरुद्ध आमची भूमिका स्पष्ट आहे. याबाबत आम्ही पाकिस्तानसोबत चर्चा करत आहोत. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यातील मास्टरमाईंडवर कारवाई झालीच पाहिजे, असे बोल्टन म्हणाले.

वाचा- pulwama attack : काय करणार मोदी सरकार? सर्वपक्षीय बैठकीत घेणार निर्णय

गुरुवारी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यात 40 जवान शहीद झाले आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अमेरिकेच्या गृहखात्याने देशातील नागरिकांना अत्यंत गरज असेल तरच पाकिस्तानमध्ये जा असा सल्ला दिला आहे.

बोल्टन यांच्याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानने प्रथम दहशतवादी संघटनांना आश्रय देणे बंद करावे. पाकच्या भूमीवरून दहशतवाद्यांना मदत आणि संरक्षण दिले जाते.

SPECIAL REPORT : युद्ध की सर्जिकल स्ट्राईक, मोदी सरकार काय करू शकतं?

First published: February 16, 2019, 9:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading