आजही बिग बींची ‘पावलं’ या ठिकाणी वळतात

आजही बिग बींची ‘पावलं’ या ठिकाणी वळतात

बिग बींच्या हटके सवयींमध्ये खूप सारे मोबाईल फोन वापरणं ही सवयही आहेच. नेटवर्क प्रॉब्लेमची त्यांना नेहमीच भिती वाटते.

  • Share this:

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बहुतांश गोष्टी त्यांच्या चाहत्यांना आधीपासूनच माहीत असतात. त्यांच्या सिनेमांपासून ते खासगी आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी इंटरनेटवर उपलब्ध आहेत. पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल फारशी माहीत नसलेली गोष्ट सांगणार आहोत...

अमिताभ यांच्या एका सवयीशी निगडीत ही गोष्ट आहे. कॉफी विथ करण शोमध्ये अभिषेक बच्चनने त्यांच्या या सवयीबद्दल सांगितले होते. अभिषेक आणि ऐश्वर्या जेव्हाही परदेशात जातात तेव्हा बिग बी हातात दोन घड्याळ घालतात. एका घडाळ्यात भारतीय वेळ असते तर दुसऱ्या हातातल्या घडाळ्यात त्या देशाची वेळ असते.

अमिताभ यांच्या सवयीशी निगडीत अजून एक गोष्ट जी फार लोकांना माहीत नाही ती म्हणजे सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजीच्या जमान्यात ते व्हॉट्सअप वापरत नाहीत.

बिग बी यांनी व्हॉट्सअप फक्त फॅमिली ग्रुपसाठी घेतलं पण त्याचा ते फार वापर करत नाहीत. जर त्यांना व्हॉट्सअपवर एखादा मेसेज पाठवला असेल तर त्यांना एसएमएस करून किंवा कॉल करून व्हॉट्सअप मेसेज पाहा असं सांगावं लागतं.

एकीकडे व्हॉट्सअपचा वापर ते करत नसले तरी आजही न चुकता ते दररोज रात्री ब्लॉग लिहायला विसरत नाहीत. दिवसभर कितीही काम केलेलं असलं तरी ते रात्री ब्लॉगसाठी वेळ काढतात आणि तो लिहीतात.

बिग बींच्या हटके सवयींमध्ये खूप सारे मोबाईल फोन वापरणं ही सवयही आहेच. नेटवर्क प्रॉब्लेमची त्यांना नेहमीच भिती वाटते. नेटवर्क प्रॉब्लेममुळे कोणापासूनही त्यांचा संपर्क तुटू नये असं त्यांना वाटतं. यामुळेच बिग बी स्वतः जवळ दोन ते तीन फोन नेहमी ठेवतात.

अमिताभ दोन्ही हातांनी लिहू शकतात. ‘कुली’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या अपघातामुळे त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. अनेक दिवस ते लिहू शकत नव्हते. यामुळे त्यांनी डाव्या हाताने लिहायला सुरुवात केली. त्यांनी ही सवय नंतर मोडू दिली नाही. आजही ते डाव्या हाताने लिहू शकतात.

अमिताभ यांना फुट मसाज करून घ्यायला फार आवडतं. पहिल्यांदा त्यांनी फिश पेडिक्योर केलं तेव्हा त्यांना ते फार आवडलं होतं. त्यानंतर आजपर्यंत अनेकदा बिग बींची पावलं फुट मसाज पार्लरमध्ये हमखास जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 13, 2019 01:11 PM IST

ताज्या बातम्या