पाटणा, 24 जून: 'Super 30' (Super 30 movie) हा सिनेमा बघितला नसेल असं कोणी कदाचितच सापडेल. आनंद कुमार (Anand Kumar super 30) या कर्तव्यदक्ष शिक्षकाच्या जीवनावर आणि संघर्षावर आधारित हा चित्रपट होता. गरीब आणि झोपडपट्टीत (Slum areas) राहणाऱ्या मुलांसाठी शिक्षणाच्या (Education in slum area) संधी उपलब्ध करून देण्याचं आणि त्यांना IIT-JEE परीक्षेत उत्तम मिळवून देण्याचं काम आनंद कुमार यांनी केलं आहे. नुकताच आनंद कुमार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर (Anand Kumar on twitter) एक फोटो शेअर केला आहे. यात त्यांनी आपल्या एका विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे.
सुपर टीचर आनंद कुमार यांनी नुकताच आपल्या एका विद्यार्थ्यांसोबत फोटो ट्विट केला आहे. कृष्ण राय (Krishna Roy) असं हा विद्यार्थ्यांचं नाव आहे. 'कधी काळी या विद्यार्थ्याला अवघ्या पन्नास रुपयांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत होता. मात्र त्यांना UPSC ची परीक्षा (UPSC Exam) पास केली आहे. आता तो असिस्टंट कमिश्नर (Assistant Commissioner) बनला आहे' असं आनंद कुमार यांनीआपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.
हे वाचा - Photography मध्ये करिअर करण्याचा विचार करताय? इथे मिळेल संपूर्ण माहिती
अभिमान वाटला
'असिस्टंट कमिश्नर (Assistant Commissioner) बनल्यानंतरही कृष्ण राय याच्या मनात गरीब आणि मागासलेल्या लोकांप्रती संवेदशीलता आहे हे बघून मला आनंद झाला.' असंही आनंद कुमार यांनी म्हंटल आहे.
कभी 50 रूपये के लिए संघर्ष करने वाला मेरा शिष्य कृष्ण राय यूपीएससी क्वालीफाई करके असिस्टेंट कमिश्नर बनकर आज मुझसे मिलने आया तब शिक्षक होने पर गर्व होने लगा | दबे-कुचले लोगों के प्रति उसकी संवेदनशीलता को देखकर मुझे लगा मेरे सीने में नह तेरे सीने में सही हो कहीं भी आग जलनी चाहिए। pic.twitter.com/t9ChrUoUge
— Anand Kumar (@teacheranand) June 21, 2021
संघर्ष थांबता कामा नये
"मेरे सीने में नह तेरे सीने में सही, हो कहीं भी आग जलनी चाहिए।' असंही आनंद कुमार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे. गरीब आणि मागासलेल्या लोकांसाठी असलेला हा संघर्ष कधीच थांबू नये. संघर्षाची ही ज्योत नेहमी तेवत राहावी असा संदेश यातून त्यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.