सुपारी किलर इम्रान मेहंदी कोर्टातून जाणार होता पळून, पोलिसांनी उधळला डाव

सुपारी किलर इम्रान मेहंदी कोर्टातून जाणार होता पळून, पोलिसांनी उधळला डाव

औरंगाबाद माजी नगरसेवक सलीम कुरेशी हत्या प्रकरणी सुपारी किलर इम्रान मेहंदीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलीय.

  • Share this:

औरंगाबाद, 27 आॅगस्ट : औरंगाबाद माजी नगरसेवक सलीम कुरेशी हत्या प्रकरणी सुपारी किलर इम्रान मेहंदीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलीय. कुरेशी यांची इम्रान मेहंदीनं जिवंत गाडून हत्या केली होती. इम्रान मेहंदीवर सुपारी घेऊन नऊ हत्या केल्याचा आरोप आहे. एका खूनप्रकरणी त्याला मकोका अंतर्गत जन्मठेप सुनावण्यात आलीय. मात्र, आज कोर्ट आवारातून इम्रान मेहंदीचा पळू जाण्याचा प्लॅन होतो तो वेळीच पोलिसांना हाणून पाडला.

नऊ जणांची हत्या करणाऱ्या इम्रान मेहंदीला औरंगाबादचे माजी नगरसेवक सलीम कुरेशी हत्या प्रकरणी मोठ्या कडेकोट बंदोबस्तात औरंगाबादच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. कोर्टाने सलीम कुरेशी हत्येप्रकरणी इम्रान मेहंदीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा आणि पाच लाखांचा दंड ठोठावला.

मात्र दुसरीकडे सुपारी किलर इम्रान मेहंदीच्या डोक्यात भलताच प्लॅन शिजत होता. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कडेकोट बंदोबस्तातून पळून जाण्याचा प्लॅन रचला होता. गुन्हे शाखेने दहा जणांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून एक बंदूक आणि आठ जिवंत कडातूस जप्त केली आहे. यातील सात जण मध्यप्रदेशातील तर तीन जण महाराष्ट्रातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये. हे सर्व आरोपी नारेगाव भागातून गाडीतून जात असताना पोलिसांनी या दहा जणांना ताब्यात घेतलं. या कारवाई नंतर इम्रान मेहंदीला मोठ्या बंदोबस्तात न्यायालयात आणले. हे सर्व आरोपी मेहंदीला पळवून नेणार होते अशी माहिती या आरोपींनी पोलिसांना दिली.

पोलिसांनी खबरदारी घेत शहरात पोलीस बंदोबस्त वाढवला असून ठिकठिकाणी धरपकड सुरू आहे.

First published: August 27, 2018, 5:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading