सनी लिओनीसोबत फिरतोय विराट कोहली? व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल दंग

सनी लिओनीसोबत फिरतोय विराट कोहली? व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल दंग

एका सेकंदासाठी मलाही वाटलं की विराट सामना सोडून इथे काय करतोय. त्याला तर मैदानावर असणं अपेक्षित आहे.

  • Share this:

मुंबई, ३१ मार्च- बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सनी एका अज्ञात व्यक्तीसूत एअरपोर्टवर जाताना दिसत आहे. ही व्यक्ती भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीसारखीच दिसते. अनेकजण अजूनही त्या व्यक्तिला विराट असल्याचंच म्हणत आहेत. पण ती व्यक्ती विराट कोहली नाही.

फोटोग्राफर विरल भयानी यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये विरल यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘एका सेकंदासाठी मलाही वाटलं की विराट सामना सोडून इथे काय करतोय. त्याला तर मैदानावर असणं अपेक्षित आहे.’ अवघ्या तीन तासांमध्ये या व्हिडिओला लाखाहून अधिक लाइक्स मिळाले तर अनेकांनी हा व्हिडिओ शेअरही केला.

विराट कोलहीसारखा दिसणारी हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून सनीचा मॅनेजर सनी रजनी आहे. सनीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच वीरमादेवी सिनेमात दिसणार आहे. यात ती एक योद्ध्याची भूमिका साकारणार आहे. विराट कोहली सध्या आयपीएलच्या सामन्यांमध्ये व्यग्र आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा तो कर्णधार आहे.

First published: March 31, 2019, 10:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading