मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक, 'असं' आहे वेळापत्रक

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक, 'असं' आहे वेळापत्रक

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर आज सकाळी १०.३० ते दुपारी ४ पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

  • Share this:

08 एप्रिल : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर आज सकाळी १०.३० ते दुपारी ४ पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण आणि विठ्ठलवाडी स्थानकांमधील पुलावरील गर्डर बदलण्याच्या कामासाठी कल्याण आणि कर्जतमध्ये अप आणि डाऊन मार्गावर स. १०.३० ते दु. ३ पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे लोकल सेवांवर परिणाम होणार आहे. या मेगाब्लॉकमुळे सीएसएमटी ते कल्याण दरम्यान अन्य कोणताही ब्लॉक घेतला जाणार नाही. तर हार्बर लाईनवर वाशी ते कुर्लामध्ये अभियांत्रिकी काम केलं जाईल. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते माहीमदरम्यान मेगाब्लॉक असेल.

रद्द होणाऱ्या लोकल

- सीएसएमटीहून कर्जत-खोपोली-बदलापूर-अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या लोकल

- ठाण्याहून कर्जत-बदलापूरसाठी जाणाऱ्या लोकल

- अंबरनाथ-बदलापूर-कर्जत-खोपोली ते सीएसएमटीपर्यंत जाणाऱ्या लोकल

- कर्जतहून ठाण्याच्या दिशेने जाणारी दु. १.२७ ची लोकल

पश्चिम रेल्वेवर काही लोकल रद्द

पश्चिम रेल्वेवर रविवारी सांताक्रूझ ते माहीम अप आणि डाऊन जलद मार्गावर स. १०.३५ ते दु. ३.३५ पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

सांताक्रूझ ते माहीम दरम्यान अप आणि डाऊन जलद वाहतूक अप आणि डाऊन धिम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहे.

ब्लॉकमध्ये काही लोकल रद्द केल्या जाणार आहेत.

First published: April 8, 2018, 8:43 AM IST

ताज्या बातम्या