• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • 'या' कारणासाठी अभिनेत्रीने अचानक सोडली 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिका

'या' कारणासाठी अभिनेत्रीने अचानक सोडली 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिका

सध्या 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिका एका नव्या वळणावर आहे. अशातच मालिकेतील एका अभिनेत्रीने मालिका सोडल्याचे समोर आले आहे.

 • Share this:
  मुंबई. 09 ऑक्टोबर : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'सुंदरा मनामध्ये भरली'( sundara manamadhe bharali) ने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेचा वेगळा असा प्रेक्षकवर्ग आहे. या मालिकेतील प्रत्येत पात्र प्रेक्षकांच्या आवडते आहे. सध्या मालिका एका नव्या वळणावर आहे. मालिकेतअभिमन्यू जहागीरदार आणि लतिका यांच्यात हळुवार खुलणारं प्रेम पाहायला प्रेक्षकांनाही आवडत असल्याचे दिसत आहे. मालिका रंगात आली असताना आता या मालिकेतील हेमा जहागीरदार हे पात्र रंगवणाऱ्या अभिनेत्रीने मालिका सोडल्याचं पाहायला मिळत आहे. तिच्याजागी एक दुसरी कलाकार हे पात्र रंगवताना दिसत आहे. यापूर्वी हेमाचं पात्र साकारणारी अभिनेत्री प्रमिती प्रीत ( pramitee preet) हिने एक पोस्ट करत मालिका सोडण्याचे कारण सांगितले आहे. प्रमितीने पोस्ट करत म्हटलं आहे की, 'माझं आयुष्य काल वेगळं होतं आणि आज ते खूप वेगळं आहे. मी आता माझ्या जवळच्या प्रकल्पाचा भाग नाही सुंदरा मनामध्ये भरली. हे लिहिताना मला अश्रू अनावर झाले आहेत. पण शो पुढे गेलाच पाहिजे. मी त्यात असो किंवा नसो, माझं मन सुंदरासोबत नेहमीच असेल. सुंदरा मनामध्ये भरली सोबतचं हे वर्ष एक अद्भुत प्रवास आहे. मला त्यातील प्रत्येक सेकंदावर प्रेम होतं. सर्वांचे खूप आभार. मी आता माझ्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी थोडा वेळ घेईन. आपण हेमाला दिलेल्या सर्व प्रेमाबद्दल धन्यवाद. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करते.', अशी काहीशी भावनिक पोस्ट प्रमितीने केली आहे. प्रेक्षक देखील प्रमितीला मिस करत आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Pramitee Preet (@pramitee_)

  प्रमितीच्या चेहऱ्यावर इन्फेक्शन होत असल्याचं तिने सांगितलं. मेकअप केल्यामुळे हे इन्फेक्शन होत होतं. डॉक्टरांनी देखील प्रमितीला मेकअप न करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे प्रमितीने काही काळ छोट्या पडद्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा : Bigg Boss Marathi 3 च्या घरात मराठीतील 'हा' प्रसिद्ध अभिनेता करणार वाईल्ड कार्ड एन्ट्री  प्रमितीने यापूर्वी 'तू माझा सांगाती' आणि 'गर्जा महाराष्ट्र' या मालिकांमध्ये काम केलं आहे. प्रमिती एका मराठी चित्रपटातही झळकली आहे. प्रमिती तिच्या आरोग्यासाठी जरी मालिकेपासून दूर गेली असली तरी प्रेक्षक प्रमितीची आतुरतेने वाट पाहत आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published: