सूर्यावर जाणवतेय मोठ्या वादळापूर्वीची शांतता...शास्त्रज्ञांनी व्यक्त केली ही चिंता

सूर्यावर जाणवतेय मोठ्या वादळापूर्वीची शांतता...शास्त्रज्ञांनी व्यक्त केली ही चिंता

सोलार स्ट्रोममुळे पृथ्वीच्या चुंबिकीय क्षेत्रावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शस्त्रज्ञांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे.

  • Share this:

मुंबई, 02 मे : सूर्यमालेत पृथ्वीपासून सूर्य 14 कोटी 95 लक्ष 97 हजार 870 कि.मी. अंतरावर आहे. या सूर्याच्या हालचालींवर शास्त्रज्ञ नजर ठेवून आहेत. सूर्याच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया सुरू असतात मात्र या क्रिया थांबल्यानं आता चिंता व्यक्त केली जात आहे. ही क्रिया होणं सूर्यमालेतील ग्रहांसाठी फायद्याचं आहे. ही क्रिया थांबली तर मोठं संकट ओढवलं जाऊ शकतं असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. ही मोठ्या वादळापूर्वीची शांतता असू शकते असा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे शास्त्रज्ञांकडून चिंता व्यक्त केली जातेय. सूर्याच्या आजूबाजूला अनेक ग्रह-तारे आहेत. त्यांच्यापासून निघणारी उष्णता हे ग्रह-तारे आपल्याकडे खेचून घेत असतात. सूर्याच्या पृष्ठभागावर होणाऱ्या हालचाली या मंदावत आहेत. इतर ग्रह-ताऱ्यांच्या तुलनेत असणारा वेळ खूप जास्त असतो मात्र यावेळी ही हालचाल थांबल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

सनस्पॉडच्या अभ्यासातून ही गोष्ट आली समोर...

एखाद्या ताऱ्याची क्रिया आणि चमक त्याच्या चुंबकीय क्षेत्राद्वारे म्हणजेच मॅग्नेटिक फिल्डद्वारे होत असते. ज्यामुळे त्यावर गडद डाग तयार होतात. त्यास स्टारस्पॉट्स म्हणतात. न्यू सायंटिस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जर्मनीच्या मॅक्स प्लँक सोलर सिस्टम रिझर्स इन्स्टिट्यूटच्या टिमो रेनहोल्ड आणि त्यांच्या टीमने केपलर स्पेस टेलीस्कोपमधून सूर्यासह 396 तार्‍यांच्या हालचाली पाहिल्या. यामध्ये सूर्याच्या पृष्ठभागावरच्या हालचाली मंदावत असल्याचं दिसून आलं. ही वादळापूर्वीची शांतता असू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आता सूर्याच्या पृष्ठभागावर हालचाली मंदावल्यानं तो शांत होत असेल तर भविष्यात मोठा उद्रेकही होण्याची शक्यता आहे. त्याच्या गतिविधी वेगानं वाढू शकतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे वाचा-PHOTOS : लॉकडाऊनमध्ये 200 किमी अंतरावरून दिसलं हिमालय पर्वतरांगेचं मनमोहक दृश्यं

रीनहोल्ड यांच्या म्हणण्यानुसार सूर्याच्या पृष्ठभागावर ज्वाला आणि सौर वादळ येईल त्याचा परिणाम आपल्या पृथ्वीवरही होऊ शकतो. त्याला आपण सौर वादळ असंही म्हणतो. या सौर वादळामुळे पृथ्वीवरील इलेक्ट्रीक ग्रीड्सचं मोठं नुकसान होऊ शकतं. सौर वादळ म्हणजे तळपत्या सूर्याच्या ज्वाला वाढतात आणि त्यामुऴे वेगानं उष्ण वारे तयार होतात. हे वारे सूर्यमालेतील ग्रहांना धोका पोहचवू शकतात. सोलार स्ट्रोममुळे पृथ्वीच्या चुंबिकीय क्षेत्रावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शस्त्रज्ञांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर होणाऱ्या सर्व हालचालींकडे लक्ष ठेवून आहेत.

हे वाचा-राशीभविष्य : सिंह आणि मीन राशीच्या व्यक्तींनी रागाव ठेवायला हवं नियंत्रण

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 2, 2020, 9:46 AM IST
Tags: sun hit

ताज्या बातम्या