‘ATS प्रमुख म्हणून हेमंत करकरेंची भूमिका अयोग्य’, आता सुमित्रा महाजनांचं वादग्रस्त विधान

‘ATS प्रमुख म्हणून हेमंत करकरेंची भूमिका अयोग्य’, आता सुमित्रा महाजनांचं वादग्रस्त विधान

सुमित्रा महाजन यांनी केलेल्या विधानावरून वाद होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

इंदुर, 30 एप्रिल : भोपाळमधील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरेंबद्दल केलेल्या विधानावरून  निर्माण झालेला वाद अद्याप देखील शमलेला नाही.  पण, त्यानंतर आता लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी शहीद हेमंत करकरेंच्या ATS प्रमुख भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कर्तव्य बजावताना एटीएस प्रमुख हेमंत करकरे शहीद झाले. पण, ATS प्रमुख म्हणून त्यांची भूमिका अयोग्य होती असं सुमित्रा महाजन यांनी म्हटलं आहे. 'इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

सुमित्रा महाजन या इंदुर लोकसभा मतदारसंघातून 8 वेळा खासदार राहिल्या आहेत. 'इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना सुमित्रा महाजन यांनी हेमंत करकरेंच्या ATS प्रमुख असतानाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी दिग्विजय सिंह आणि हेमंत करकरे यांचे संबंध चांगले होते असं देखील म्हटलं आहे. सिंह यांनी आरएसएसवर सतत बॉम्ब बनवत असल्याचे आरोप केले होते. शिवाय, त्यांच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र एटीएसनं काही जणांना इंदूरमधून अटक केली होती असं देखील यावेळी महाजन म्हणाल्या.

पाणीबाणी! पुण्यात 2 मे रोजी पाणीपुरवठा बंद

दिग्विजय सिंह यांचं प्रत्युत्तर

दिग्विजय सिंह यांनी सुमित्रा महाजन यांना ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलं आहे. सुमित्रा ताई मला गर्व आहे की तुम्ही माझं नाव शहीद करकरेंशी जोडलात. तुमच्या पक्षानं त्यांना कायम अपमानित केलं. पण, करकरेंनी कायम देशहिताला प्राधान्य दिलं.

काय म्हणाल्या होत्या साध्वी प्रज्ञा?

'हेमंत करकरे यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली. त्यांना माझ्यासारख्या संन्याशांचा शाप भोवला, असं साध्वी म्हणाल्या. मी तुरुंगात गेल्यानंतर लगेचच दीड महिन्यांत दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारलं,' असं प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटलं होतं.

हाय अलर्ट! फानी चक्रीवादळाचा 'या' राज्यांना बसणार तडाखा

रामदास आठवलेंची टीका

रामदास आठवले हे भोपाळच्या दौऱ्यावर आले होते. ते म्हणाले, कुणाला उमेदवारी द्यायची हा भाजपचा प्रश्न असला तरी साध्वींना उमेदवारी द्यायला नको होती. त्यांनी शहीदांचा अपमान केला आहे. त्या ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत त्यामुळे भाजप अडचणीत येऊ शकतो. भाजपने त्यांना आवर घातला पाहिजे असं मतही आठवले यांनी व्यक्त केलं. नवं सरकार आल्यानंतर प्रमोशन देतानाही 50 टक्के आरक्षण लागू करण्याचा कायदा करण्यासाठी आग्रही राहू असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

VIDEO: 'तू मेरी हिट लिस्ट में है', भाजप नेत्याची थेट पोलिसाला धमकी

First published: April 30, 2019, 10:33 AM IST

ताज्या बातम्या