S M L

गांधीजींमुळे इंग्रज निघून गेले,असं नाही-सुमित्रा महाजन

1947 च्या लढ्याचा विचार केला पाहिजे. स्वातंत्र्य हे फक्त अहिंसक चळवळीने स्वातंत्र्य मिळालं नाही.

News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2018 11:25 PM IST

गांधीजींमुळे इंग्रज निघून गेले,असं नाही-सुमित्रा महाजन

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 08 जुलै :  केवळ अहिंसावादाच्या मार्गाने गांधीजी म्हणाले चले जाव आणि इंग्रज निघून गेले असं नाहीय, तर देशाच्या स्वतंत्र्यासाठी अनेकांना किंमत मोजावी लागली असं विधान करत लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी  पहिल्यांदाच महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य लढ्यातील  सहभागावर भाष्य केलंय. क्रांतिवीर दामोदर चाफेकर ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पिंपरी चिंचवडमध्ये घेण्यात आलेल्या टपाल तिकीटाच्या अनावरण सोहळ्या प्रसंगी त्या बोलत होत्या.

या व्यासपीठावर सुमित्रा महाजन यांनी एकवेळ क्रांतीविरांचे गोडवे गायले. 1947 च्या लढ्याचा विचार केला पाहिजे. स्वातंत्र्य हे फक्त अहिंसक चळवळीने स्वातंत्र्य मिळालं नाही. त्यावेळी अनेक घटना एकत्रित घडत गेल्यात त्यामुळे हे स्वातंत्र्य मिळालंय असं सुमित्रा महाजन यांनी म्हटलंय.

महात्मा गांधींनी घराघरात जागृती केली. त्यांच्या या कार्यामुळे घराघरातून स्त्री स्वातंत्र्य लढ्यासाठी दागिने देत होत्या. संपूर्ण भारताला स्वातंत्र्यासाठी जागृत केलं. स्वातंत्र्याची जाणीव त्यांनी करून दिली पण त्याच्यासाठी म्हणून पाठीमागची 90 वर्ष विसरून चालणार नाही त्यांना बरोबर घेऊनच चालावं लागेल ही माझी भूमिका आहे असंही महाजन म्हणाल्यात.दरम्यान, याच कार्यक्रमात मावळ लोकसभेचे सेना खासदार श्रीरंग बारणे आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  गिरीश बापट ह्यांनी एकेमकांची खिल्ली उडवली.

आम्ही काय भराव टाकून बंगले बांधले नाही किंवा गुंड पोसले नाही तर आम्ही विधायक काम केल्याचं सांगत खासदार श्रीरंग बारणे यांनी बापट व्यासपीठावरील भाजप मंत्र्यांच्या

तोंडावर नाव न घेता, भाजप संस्कृतीवर बोट ठेवलं.

Loading...
Loading...

तर कुठे काय बोलावे याचं भान पुणेकरांना आहे असा चिमटा काढत बापट यांनी खासदार बारणेंना आपल्या शैलीत फैलावर घेतलं आणि चांगलंच खजील केलं आणि ही राजकीय जुगलबंदी ऐकताना उपस्थितांमध्ये मात्र चांगलीच हशा पिकला होता.

हेही वाचा

 तिलारी घाटात कार दरीत कोसळली, 5 तरुणाचा जागीच मृत्यू

 VIDEO :एसटीचा प्रवास ठरला अखेरचा,बसखाली येऊन वृद्ध महिलेचा मृत्यू

ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मनू श्रेष्ठ- संभाजी भिडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 8, 2018 10:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close