पंतप्रधानपदाची आब राखा, सुमित्रा महाजन यांची राहुल गांधींना समज

पंतप्रधानपदाची आब राखा, सुमित्रा महाजन यांची राहुल गांधींना समज

गळाभेटीवरून लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी राहुल गांधींना समज दिली आहे. पंतप्रधानपदाचा आब राखला पाहिजे असं त्या म्हणाल्या.

  • Share this:

नवी दिल्ली,ता. 20 जुलै : गळाभेटीवरून लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी राहुल गांधींना समज दिली आहे. सभागृहातलं वर्तन हे परिपक्वपणाचं पाहिजे. इथं संकेत आणि नियमांनुसार सर्व कामकाज चालते. पंतप्रधानपदाला एक घटनात्मक महत्व आहे आणि त्याचा आब राखलाच पाहिजे असंही त्या म्हणाल्या. सभागृहाची प्रतिष्ठा राखण्याचं काम आपल्या सर्वांनाच करावं लागेल. बाहेरचा कुणी येवून हे काम करणार नाही. तुम्ही सगळ्यांनी प्रेमाणं राहिलं पाहिजे. राहुल हे मुलासारखेच असून ते माझे दुष्मन नाहीत असंही सुमित्रा महाजन म्हणाल्या. राहुल गांधीनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारलेली मिठी आणि नंतर मारलेला डोळा याची चर्चा माध्यमांमधून होत आहे त्याची दखल सुमित्रा महाजन यांनी घेतली.

कशी झाली गळा भेट

राहुल गांधींनी भाषणात प्रेम आणि व्देषाचा मुद्दा उपस्थित केला. मी नरेंद्र मोदींवर कठोर टीका केली मात्र त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे. तुम्ही मला पप्पू म्हणा किंवा आणखी काहीही म्हणा मला तुमच्याबद्दल आदरच आहे. मात्र माझ्याबद्दल तुमच्या मनात व्देष भरला आहे. कमालीचा व्देष भरला आहे. असं म्हणत राहुल गांधी आपल्या आसनावरून चालत पंतप्रधानांच्या आसनाकडे गेले आणि त्यांनी पंतप्रधानांची गळाभेट घेतली. राहुल गांधींच्या या अनपेक्षीत कृतीनं सर्व सभागृह आश्चर्यचकीत झालं. राहुल काय करत आहेत ते मोदींनाही काही क्षण समजलच नाही. नंतर राहुल गांधी परत जाताना मोदींनी त्यांना बोलवून घेतलं आणि पुन्हा हस्तांदोलन करत काही वाक्य ते बोलले. नंतर राहुल आपल्या आसनावर बसल्यानंतर त्यांच्या चेहेऱ्यावर हास्य होतं. त्यांनी काही सहकाऱ्यांना डोळाही मारला, काय कमाल केली असा भाव त्यांच्या चेहेऱ्यावर होता. राहुल गांधींच्या या धक्का तंत्राने मात्र सगळ्यांनाच धक्का दिला. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा...

VIDEO : राहुल गांधींच्या 'जादू की झप्पी'ने मोदींना धक्का!

राहुल गांधींनी नेमका कुणाला मारला डोळा?

मोदी सरकारवर 'अविश्वास' दाखवणारे कोण आहेत जयदेव गल्ला?

अविश्वास ठरावाच्या वेळी शिवसेना अनुपस्थित राहणार, सूत्रांची माहिती

First published: July 20, 2018, 5:37 PM IST

ताज्या बातम्या