छत्तीसगड पोलिसांची मोठी कारवाई, 14 माओवाद्यांचा खात्मा

छत्तीसगड पोलिसांची मोठी कारवाई, 14 माओवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडच्या सुकमामध्ये सुरू असलेल्या चकमकीत १४ माओवाद्यांना ठार करण्यात आलं आहे.

  • Share this:

छत्तीसगड, 06 ऑगस्ट : छत्तीसगडच्या सुकमामध्ये सुरू असलेल्या चकमकीत १४ माओवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. माओवाद्यांकडून १६ मोठी शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत. कोंता आणि गोलापल्ली पोलीस स्टेशनच्या हद्दींमध्ये हा परिसर येतो. या परिसरात 14 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात छत्तीसगड पोलिसांना मोठं यश आलं आहे. सुकमा जिल्हयात किष्टारम भागातल्या जंगलात ही चकमक झाली आहे. पोलीस अधीक्षक अभिषेक मीणा यांनी नक्षलवाद्यांना मारल्याच्या घटनेची पुष्टी दिली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोलापल्ली आणि कॉन्टा पोलीस ठाण्यातील सुमारे 100 नक्षलवाद्यांची बैठक सुरू होती. माहिती अधिकाऱ्यांच्या माहितीनंतर सुरक्षा दलांनी एक रणनीती आखली आणि माओवाद्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात 14 माओवाद्यांचा खात्मा करण्यात छत्तीसगड पोलिसांना यश आलं आहे. याबद्दल अजुनही सर्चिंग आपरेशन सुरू आहे.

VIDEO : गावितांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ नंदूरबार बंद, आंदोलकांनी केली जाळपोळ

हाती लागलेल्या माहितीनुसार, 4 आयईडी आणि 16 शस्त्रे घटनास्थळावरून जप्त करण्यात आली आहेत. छत्तीसगढमध्ये या वर्षाची ही सर्वात मोठी कारवाई आहे. संयुक्त कार्यवाही केल्यानंतर डीआरजी, एसटीएफ आणि सीआरपीएफने ही संयुक्त कारवाई केली आहे.

दरम्यान एप्रिल महिन्यातही गडचिरोली जिल्हयाच्या सीमेला लागून असलेल्या तेलंगणाच्या जंगलात एक चकमक झाली होती. या चकमकीतही 6 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. भोपालपल्ली जिल्ह्याच्या अन्नारम ते वेंकटापुरम दरम्यानची ही घटना घडली होती. तेलंगणा सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या ग्रेहाऊंडसच्या जवानांनी ही कारवाई केली होती.

हेही वाचा...

VIDEO : 'मला तिथे माझा मृत्यू समोर दिसत होता'

फ्रेंडशिप डेच्या पार्टीमध्ये मैत्रीचा खून, हातपाय तोडून दगडाने ठेचून मारलं

शौचालयाच्या छतावर मोबाईल ठेऊन 'तो' करायचा महिलांची व्हिडिओ रेकॉर्डिंग

First published: August 6, 2018, 1:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading