• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतींची कन्या करणार धर्मांतर, लवकरच होणार हिंदू

सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतींची कन्या करणार धर्मांतर, लवकरच होणार हिंदू

जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या माजी राष्ट्रपतींची कन्या मुस्लीम धर्मातून (Sukamavati to enter Hindu religion from Muslim) हिंदू धर्मात प्रवेश करणार आहे.

 • Share this:
  जकार्ता, 24 ऑक्टोबर : जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या माजी राष्ट्रपतींची कन्या मुस्लीम धर्मातून (Sukamavati to enter Hindu religion from Muslim) हिंदू धर्मात प्रवेश करणार आहे. इंडोनेशियाचे माजी राष्ट्रपती सुकर्णो यांच्या कन्या सुकमावती सुकर्णोपुत्री या लवकरच हिंदू धर्मात प्रवेश करणार असल्याची माहिती (Soon to enter  Hindu religion) जाहीर करण्यात आली आहे. 26 ऑक्टोबर या दिवशी एका पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पूजेच्या माध्यमातून त्यांचा हिंदू धर्मात प्रवेश होणार आहे. काय आहे प्रकरण? इंडोनेशियाचे माजी राष्ट्रपती सुकर्णो यांच्या 70 वर्षांच्या कन्या सुकमावती यांनी स्वमर्जीने हिंदू धर्मात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी राष्ट्रपती सुकर्णो यांच्या त्या तिसऱ्या कन्या आहेत, तर माजी राष्ट्रपती मेगावती सुकर्णोपुत्री यांची धाकटी बहीण आहेत. इंडोनेशियातच राहणाऱ्या सुकमावती गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हिंदू धर्मात प्रवेश घेण्याचा विचार करत होत्या. त्यांचा विचार आता निश्चित झाला असून 26 ऑक्टोबरला त्यांचं धर्मांतर होणार आहे. का बदलला धर्म? 2018 साली सुकमावती यांनी एक कविता लिहिली होती. या कवितेत मुस्लीम धर्मातील काही प्रकारांवर टीका करण्यात आली होती. यामुळे कट्टरपंथीय मुस्लीम नागरिक भडकले होते आणि त्यांनी सुकमावती यांच्यावर जोरदार टीका केली होती. टीकाकारांच्या आक्रमकपणाकडे पाहून सुकमावती यांनी माफी मागितली होती. मात्र तरीही टीकाकारांचा राग काही शांत झाला नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे या धर्मात राहण्याऐवजी धर्म बदलण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हे वाचा- ठरला शेवटचा Birthday, ड्रग्स माफियांच्या गोळीबारात भारतीय महिलेची हत्या हिंदू धर्मच का? सुकमावती यांच्या आजोबांचा धर्म हिंदू होता. शिवाय लहानपणापासून आपण हिंदू धर्मियांचे अनेक कार्यक्रम पाहिले असून त्या धर्मातील अनेक परंपरा आपल्याला आवडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हिंदू धर्मशास्त्राचा अभ्यासही त्यांनी केला असून आपल्या मर्जीने हा धर्म स्विकारत असल्याचं म्हटलं आहे. 26 तारखेला ‘शुद्धी वदानी’ नावाचा कार्यक्रम होईल आणि त्यांचा हिंदू धर्मात प्रवेश होईल. इंडोनेशिया हा सर्वात मोठा मुस्लीम देश मानला जातो. त्या देशातील ही घटना जगाचं लक्ष वेधून घेणारी आहे.
  Published by:desk news
  First published: