घरातील वाद चव्हाट्यावर! 2 मुलांचा आधार गेला, भर रस्त्यात पेट्रोल ओतून व्यक्तीची आत्महत्या

घरातील वाद चव्हाट्यावर! 2 मुलांचा आधार गेला, भर रस्त्यात पेट्रोल ओतून व्यक्तीची आत्महत्या

ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीमध्ये जास्त प्रमाणात भाजल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

  • Share this:

असिफ मुरसल, प्रतिनिधी

सांगली, 19 नोव्हेंबर : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात एका व्यक्तीने भर रस्त्यामध्ये अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या केली. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीमध्ये जास्त प्रमाणात भाजल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

कुंडल गावातील श्रीकांत सावंत या 43 वर्षीय व्यक्तीने घरगुती वादातून अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या केली.  हा सर्व प्रकार दुपारी भर उन्हात घडला. श्रीकांत सावंत यांना मानसिक त्रास होता असं त्यांच्या कुटूंबियांनी सांगितलं. सावंत यांना 2 मुले आहेत. हा प्रकार सावंत यांनी शेजारी राहात असणाऱ्यांच्या अंगणात केला. घटनास्थळी कुंडल पोलीस दाखल झाले असून. श्रीकांत सावंत यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरून श्रीकांत यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान घरातून झालेल्या शुल्लक वादामुळे श्रीकांत यांनी टोकाचं पाऊल उचललं. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

श्रीकांत यांनी नेमक्या कोणत्या कारणावरून आत्महत्या केली याचा शोध घेण्यासाठी पोलीस सावंत कुटूंबीयांची चौकशी करणार आहेत. याविषयी शेजाऱ्यांचीदेखील चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2019 03:15 PM IST

ताज्या बातम्या