ब्रेस्ट कॅन्सर पीडित महिलेनं मुलाला आधी पाण्यात बुडवलं, नंतर केली आत्महत्या

ब्रेस्ट कॅन्सर पीडित महिलेनं मुलाला आधी पाण्यात बुडवलं, नंतर केली आत्महत्या

ब्रिटनमध्ये एका तरुण महिला रशियन फायनान्सरनं (Russian Financier Suicide) आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

लंडन, 29 ऑगस्ट: ब्रिटनमध्ये एका तरुण महिला रशियन फायनान्सरनं (Russian Financier Suicide) आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही महिला गेल्या काही दिवसांपासून स्तन कॅन्सरनं (Breast Cancer) पीडित होती. यूलिया गोक्सेडॅग असं या महिलेचं नाव होतं. यूलिया हिनं आपल्या सात वर्षीय मुलाला पाण्यात बुडवून (Yulia Drowned Son) ठार मारलं. नंतर स्वत: आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा...धक्कादायक! विष घेऊन महिलेनं संपवलं आयुष्य, मांडीवर लिहिली सुसाईड नोट

मेट्रोपोलिटेन पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 35 वर्षीय यूलिया आणि तिचा मुलगा तिमुर 12 ऑगस्टपासून बेपत्ता होते.

मात्र, लंडनमधील ऑइल ऑफ डॉग्स येथील आलिशान फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत यूलिया तर तिचा मुलगा तिमूर मृतावस्थेत आढळून आला होता. आता यूलिया आणि तिच्या मुलाचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आले आहेत. यूलिया हिचा मृत्यू गळफास घेवून तर तिमूर याच्या मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

यूलिया हिचा मित्र आणि माजी सहकारी अग्निऐस्जका लियोनोविक्जने सांगितलं की, यूलिया स्तन कॅन्सरने पीडित होती. मात्र देखील देखील ती उत्कृष्ट काम करत होती. तर शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीनं सांगितलं की, यूलिया ही गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती.

मेहमेटसोबत थाटला होता संसार...

यूलियाच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीनं सांगितलं की, दुर्दैवी बाब म्हणजे ती स्तन कॅन्सरविरूद्ध लढा देत होती. यूलिया मुलाची हत्या करून स्वत: ही आत्महत्या करेल, यावर विश्वास बसत नाही आहे.

यूलियाचा विवाह बँक इन्व्हेस्टमेंटर मेहमेट गोक्सेडैग याच्याशी झाला होती. सन 2011 मध्ये दोघांना संसार थाटला होता. विवाहानंतर एका वर्षात दोघे लंडनमध्ये स्थायिक झाले होते.

हेही वाचा...जन्मदाता बापच निघाला नराधम, 9 वर्षाच्या लेकीवर लॉकडाऊनमध्ये रोज केला बलात्कार

आत्महत्येपूर्वी फेसबुकवर शेअर केला फोटो...

यूलियाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या फेसबुक अकाऊंटवर पतीसोबतचा लंडनमधील एक फोटो शेअर केला होता. सन 2013 मध्ये तिमुरचा जन्म झाला. नंतर तिघे तुर्कीला पर्यटनासाठी गेले होते. मात्र, यूलिया पतीसोबत राहात होती की नाही, याबाबत माहिती समजू शकली नाही.

Published by: Sandip Parolekar
First published: August 29, 2020, 2:10 PM IST

ताज्या बातम्या