या अॅपमुळे बिघडला सुहाना खानचा चेहरा, तुम्ही पाहिलात का?

या अॅपमुळे बिघडला सुहाना खानचा चेहरा, तुम्ही पाहिलात का?

जेव्हाही शाहरुखला सुहानाच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल विचारलं जातं तेव्हा शाहरुख तिचं शिक्षण संपल्यानंतर ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल असं उत्तर तो देतो.

  • Share this:

मुंबई, ११ फेब्रुवारी २०१९- बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानची मुलगी सुहाना अशा स्टार किड्समध्ये येते जिच्यावर साऱ्यांचीच नजर असते. तिचे प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. आताही काहीसे असेच झाले आहेत. इन्स्टाग्रामवरचा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुहाना अनन्या पांडे आणि शनाया कपूर या आपल्या मैत्रिणींसोबत दिसत आहे.

सुहानाचा हा व्हिडिओ स्नॅप चॅटवरून घेण्यात आला आहे. यात चित्र- विचीत्र फिल्टरचा वापरक केलेला दिसतो. या फिल्टरमुळे तिघींचाही चेहरा वेगळाच दिसतो. तुम्हीही जर स्नॅप चॅट वापरत असाल तर तुम्हीही हे फिल्टर एकदा तरी वापरून पाहिलेच असेल. पण सुहानाची गोष्ट वेगळी आहे. तिने काहीही केलं तरी त्याची बातमी होतेच.

काही दिवसांपूर्वी सुहाना ज्या नाटकात काम करते त्या नाटकातील एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो रोमियो अँड ज्युलियट या नाटकातला आहे.

View this post on Instagram

A post shared by Suhana Khan ✨ (@suhanakhan143) on

फोटोमधील सुहानाचे हावभाव पाहून किंग खानचे चाहते चांगलेच खूश झाले होते. कारण शाहरुखचे चाहते तिच्या बॉलिवूड एण्ट्रीची आतुरतेने वाट पाहत आहेत. जेव्हाही शाहरुखला सुहानाच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल विचारलं जातं तेव्हा शाहरुख तिचं शिक्षण संपल्यानंतर ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल असं उत्तर तो देतो.

First published: February 11, 2019, 2:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading