ऊस दराबाबतची बैठक निष्फळ, आंदोलन सुरू

ऊस दराबाबतची मुंबईतली बैठक निष्फळ ठरलीये. शेतकरी संघटना आणि सहकारमंत्र्यांमध्ये बैठक होती. त्यात शेतकरी संघटना 3 हजार 500 भावावर ठाम राहिल्याने कोणताच तोडगा निघू शकला नाही. ऊस उत्पादकांना साडेतीन हजारांचा भाव दिल्याशिवाय कारखाने चालू देणार नाही, असा इशारा रघुनाथदादा पाटील यांनी दिलाय. तर राजू शेट्टींनी 3400चे भाव देण्याची मागणी लावून धरलीय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2017 06:44 PM IST

ऊस दराबाबतची बैठक निष्फळ, आंदोलन सुरू

मुंबई, 02 नोव्हेंबर : ऊस दराबाबतची मुंबईतली बैठक निष्फळ ठरलीये. शेतकरी संघटना आणि सहकारमंत्र्यांमध्ये बैठक होती. त्यात शेतकरी संघटना 3 हजार 500 भावावर ठाम राहिल्याने कोणताच तोडगा निघू शकला नाही. ऊस उत्पादकांना साडेतीन हजारांचा भाव दिल्याशिवाय कारखाने चालू देणार नाही, असा इशारा रघुनाथदादा पाटील यांनी दिलाय. तर राजू शेट्टींनी 3400चे भाव देण्याची मागणी लावून धरलीय. दरम्यान, या बैठकीच्या निमित्ताने राजू शेट्टी आणि कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत हे दोन शेतकरी नेते प्रथमच आमनेसामने आल्याचं बघायला मिळालं पण त्यांच्यात कोणताच संवाद झाला नाही. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये येत्या 8 तारखेला पुन्हा बैठक पार पडणार आहे. पण तोपर्यंत कारखाने चालू देण्यावर शेतकरी संघटना ठाम आहेत. मुंबईतली ऊसदराबाबतची बैठक निष्फळ ठरताच तिकडे कोल्हापुरात शेतकऱ्यांनी ऊस वाहतूक बंद पाडलीय. तर उसाला साडे तीन हजारांचा दर देण्याची ही मागणी व्यवहार्य नसल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं आहे. एफआरपीचे पैसे सुलभतेनं मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, सिस्टीम ऑनलाईन केली जाईल, वजनकाटे नियंत्रणात ठेवण्यासाठी वजनकाटे समिती गठीत केली जाईल, असंही सहकार मंत्र्यांनी सांगितलं.

तर रघुनाथदादा पाटील यांनी गुजरात आणि इतर राज्यात एकाच पक्षाचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये उसाला चांगला भाव मिळतो. मात्र, महाराष्ट्रात एफआरपी कमी सांगितली जात आहे. त्यामुळे आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागत आहोत. ऊस शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावू नका, असा इशाराही रघुनाथ पाटील यांनी यावेळी दिला.

दरम्यान, सरकार शेतकऱ्यांच्याच बाजूनं काम करत असून त्यांना ऊसाला क्विंटलमागं 3400 ते 3500 रुपयांचा देण्यासाठी प्रयत्न करेल, असं आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2017 06:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...