मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

साखर कारखाना हे राजकारण नाही तर..., शरद पवारांनी ऊस उत्पादकांना फटकारले

साखर कारखाना हे राजकारण नाही तर..., शरद पवारांनी ऊस उत्पादकांना फटकारले

'साखर काढून हा धंदा टिकणार नाही, वीज निर्मिती करण्याचा विचार केला पाहिजे. वीज निर्मितीबाबत आम्ही राज्यातील मंत्र्यांशी बोलू मार्ग काढू'

'साखर काढून हा धंदा टिकणार नाही, वीज निर्मिती करण्याचा विचार केला पाहिजे. वीज निर्मितीबाबत आम्ही राज्यातील मंत्र्यांशी बोलू मार्ग काढू'

'साखर काढून हा धंदा टिकणार नाही, वीज निर्मिती करण्याचा विचार केला पाहिजे. वीज निर्मितीबाबत आम्ही राज्यातील मंत्र्यांशी बोलू मार्ग काढू'

  • Published by:  sachin Salve

श्रीगोंदा, 14 नोव्हेंबर : 'उसाचे पीक घेतले का गडी त्याकडे लक्ष देत नाही. द्राक्ष पीक घेतले तर त्याकडे लक्ष दिले जाते. उसाची लागण केली तर त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. लागण झाली की नाशिकला जाऊन बसतो. सगळ्या जगाची चर्चा करत बसतो, उसाचे काय झालं त्याकडे लक्ष देतो. निवडणूक आणि बाकीच्या गोष्टीकडे लक्ष घालता, साखर कारखाने ( sugar factory) हे राजकारण नाही तर धंदा आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी ऊस उत्पादकांचे कान टोचले.

श्रीगोंदायेथील शिवाजीराव बापू नागोडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, हसन मुश्रीफ,जलसंपदा मंत्री जयंत पाटील,भाजप नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील  उपस्थित होते.

'बंद पडलेला कारखाना सुरू करण्याची हिंमत येथील आमदारांनी दाखवली. त्याबद्दल अभिनंदन करतो आज मोळी टाकलीय उद्या त्याची साखर होईल. साखर कारखान्याच्या जन्म महाराष्ट्रात झाला आहे. सासवडमध्ये पहिला सहकारी साखर आणि दुसरा सहकारी साखर कारखाना श्रीराममध्ये होता, असं यावेळी पवार म्हणाले.

Childrens Day Special : बिग बॉसच्या घरातील 'या' स्पर्धकांना ओळखलं का?

साखर काढून हा धंदा टिकणार नाही, वीज निर्मिती करण्याचा विचार केला पाहिजे. वीज निर्मितीबाबत आम्ही राज्यातील मंत्र्यांशी बोलू मार्ग काढू. वीज निर्मितीसाठी कारखाने पुढे आले ही आनंदाची बाब आहे. अनेक वाहन ही इथेनॉलमध्ये आणलीय, बाहेरच्या देशात हे होतंय तर आपल्याकडे होईल, असं आश्वासन पवारांनी दिलं.

ऊसाचा टनाला जितका भाव मिळतोय त्यापेक्षा इथनॉल ला दुपटीने भाव मिळेल हे मी खात्रीने सांगतो. वीज आणि हायड्रोजन तयार करण्याचा प्रयत्न करता येईल. शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर ती भरपाई करण्याची हिंमत ठेवली पाहिजे, असंही पवारांनी ठामपणे सांगितलं.

जगाला साखर पुरवण्याची जबाबदारी महाराष्ट्राची  आहे. जगाला साखर देणारे देश अडचणीत आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाचा उस निर्माण केला पाहिजे, त्याचा उतारा चांगला काढला पाहिजे. बारामतीमधून मी येतो तिथं तीन कारखाने उत्तम काम करताय. VSI ही संस्था जगात चांगलं काम करतेय, रासाका बाबत तिथून मार्गदर्शन घेतले आहे त्यामुळे आपल्या कारखान्याला यश येईल, त्यासाठी तुम्ही साथ दिली पाहिजे. ब्राझील चा कारखाना हा जसे काम करतो तसे काम करावे लागेल ते कारखाने ३५ हजार टन उस गाळप करतात, अशी माहितीही पवारांनी दिली.

अडीच वर्षात 35 पैशांचा शेअर 146 रुपयांवर, गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे 4 कोटी

निवडणूक आली की किंमत करू नका. कारखाना सुरू केला की कामगारांना चांगला पगार द्या. कारभार चांगला करा, संस्था तोट्यात जाणार नाही याचा विचार करा, असं म्हणत निफाड कारखान्याबाबत मध्यस्थी करायला तयार असल्याचे पवारांनी सांगितलं.

First published:

Tags: Nashik, शरद पवार