'नथुराम गोडसेचा जन्म बारामतीचा आहे हे दुर्दैव'

'नथुराम गोडसेचा जन्म बारामतीचा आहे हे दुर्दैव'

अंकगणितावर अर्थशास्र होत नाही, तर त्यासाठी शिवरायांची इच्छाशक्ती लागते. आपल्याकडे शक्ती कमी नाही, ज्ञान कमी नाही. फक्त इच्छाशक्ती पाहिजे आणि ती शक्ती या सरकारमध्ये आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 25 जून : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज अर्थसंक्ल्पावरच्या चर्चेला उत्तर दिलं. चर्चेदरम्यान विरोधकांनी जे आरोप केले होते त्या सर्व आरोपांना सुधीर मुनगुंटीवार यांनी पुरावे देत उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारनं महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त ज्या तरतूदी केल्या त्यावरून विरोधी पक्षांनी भाजप आणि राज्य सरकारवर टीका केली होती त्याला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले नथुराम गोडसेचा जन्म हा बारामतीत झाला हे दुर्दैव आहे असा टोला त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला.

मुनगंटीवार म्हणाले, नथुराम गोडसे यांचा जन्म बारामतीचा आहे हे दुर्दैव आहे. माझ्याकडे प्रमाणपत्र नाही, इंटरनेटवर आहे त्याचे प्रिंट आऊट काढा. मी 101 टक्के सांगतो त्यांचा जन्म हा बारामतीतच झालाय. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य आंदोलनातील सर्वात जास्त काळ महाराष्ट्रात व्यतित केला होता. ही बाब आपल्यासाठी अभिमानाचा विषय आहे. गांधींनी चले जावचा नारा गवालिया टँकवर दिला. गवालिया टँकवर चलेजावच्या आंदोलनाचा स्तंभ उभा केलाय आणि त्यावर कमळाचं फूल आहे.

पैसा कमी पडू देणार नाही

तालुका स्तरावर उभारण्यात येणाऱ्या स्टेडियमसाठी एक कोटीची तरतुद वाढवून 5 कोटी रुपये केली जाईल. संजय गांधी निराधार योजनेतील पैसे दोन महिन्यात मिळत नाहीत. कधी तीन महिन्यांनी, कधी चार महिन्यांनी मिळतात. यापुढे हे पैसे नियमितपणे मिळतील असे येत्या तीन महिन्यात प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

जयंत पाटील यांच्या झिंग झिंग झिंगाट कवितेलाही सुधीर मुनगुंटीवार यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, उरात होते धडधड सत्ता जायची वेळ आली अशी तुमची कविता होती. आमच्या उरात धडधड होत नाही. त्यांच्याच उरात होते धडधड ज्यांची क्षणात सत्ता गेली

राज्य कर्जबाजारी नाही

हे राज्य कर्जबाजारी आहे असा आरोप विरोधकांनी केला. कर्ज हे किती कोटीचं आहे मोजलं जात नाही, तर ऋणभार किती आहे त्यावर सांगितलं जातं. 28.2 टक्क्यांपर्यंत ऋणभार मागील सरकारमध्ये होता, आम्ही तो 15 टक्क्यांपर्यंत आणला. कर्जमुक्ती दिली, सातवा वेतन आयोग दिला, पण पैसा कमी पडू दिला नाही.

1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करणं हे कठिण आहे असं तुम्ही म्हणता, पण तुम्ही साधं गणित बघत नाही, अंकगणिताच्या पुस्तकानुसार तुम्ही बरोबर आहात, पण अजून एक पुस्तक शिक्षण विभाग देतो, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. इयत्ता चौथी ते तुम्ही वाचलं नाही. अंकगणितावर अर्थशास्र होत नाही, तर त्यासाठी शिवरायांची इच्छाशक्ती लागते. आयफोन, मायक्रोसॉफ्ट, गुगल या कंपन्या आज वन ट्रिलियन डॉलरची उलाढाल करतात. यात भारतीय लोक काम करतात. आपल्याकडे शक्ती कमी नाही, ज्ञान कमी नाही. फक्त इच्छाशक्ती पाहिजे आणि ती शक्ती या सरकारमध्ये आहे.

First published: June 25, 2019, 8:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading